
नांदगाव ( प्रतिनिधी)- येथील सकल जैन समाजाच्या वतीने मुंबई येथील जैन मंदिर तोडल्याबद्दल तसेच कश्मीर येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याच्या निषेधार्थ मूक निषेध मोर्चा काढून नांदगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले याप्रसंगी मध्यप्रदेश येथे जैन साधूंवर वर झालेल्या भ्याड हल्ल्याचा, पतंजली कंपनीच्या रामदेव बाबा यांनी भगवान महावीरांच्या वरती केलेल्या विधानाचा व काही राजकीय नेत्यांनी धर्मावर केलेल्या टीकेचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले रस्त्यावरील अपघातांमध्ये पाई भ्रमण करणाऱ्या जैन साधू साध्वी संतांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण एकाएकी प्रचंड वाढले आहे यावर चिंता व्यक्त करण्यात आली भगवान महावीर मार्गावरील प्राचीन दिगंबर जैन मंदिरापासून मूक मोर्चा प्रारंभ झाला ओसवाल भुवन मार्गे महात्मा गांधी चौक डॉ. आंबेडकर चौक मार्गाने मोर्चा पोलीस स्टेशन येथे आला जैन बांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून काळ्याफिती लावलेल्या होत्या पोलीस स्टेशन मध्ये मोर्चा आल्यानंतर ओसवाल भुवन प्रबंधक समितीचे अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी सकल जैन समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनाविषयी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत तिचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, महामंत्री महावीर ताराचंद पांडे, संघपती सुभाष लोढा, महामंत्री विजय चोपडा ओसवाल भुवन प्रबंधक समितीचे उपाध्यक्ष कमलेश पारख, सचिन मनोहरमल पारख , महावीर पारख, आनंद कासलीवाल आनंद चोपडा , सुशील कासलीवाल महावीर सुराणा , दिलीप सेठी, निलेश सुराणा, महिंद्र आबड, चंचल गंगवाल, आनंद काला, अंकुश सुराणा, निलेश पाटणी, सुदेश गंगवाल, दीपक बडजाते आदीं सह असंख्य जैन बांधवांच्या निवेदनावरती सही असून पोलीस निरीक्षक श्री बाहावकर यांनी निवेदन स्वीकारले शेकडोंच्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते
