
मनमाड (प्रतिनिधी)बुधवार दि. 23/04/25 रोजी रापली गेटच्या पुढे मनमाड सरस्वती शाळेकडे जाणारा रस्ता दरगुडे मळा काखंडी यांच्या इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ 08:22 च्या सुमारास बिबट्या आढळला अशी सविस्तर माहिती प्रत्यक्षदर्शी माजी नगराध्यक्ष साईनाथ गीडगे यांचे ड्रायव्हर नितीन कांगणे हे हायवा गाडी घेऊन जात असताना बिबट्या दृष्टीस पडला धरणाच्या दिशेने पळताना आढळून आले त्यामुळे वागदर्डी मनमाड रापली परिसरातील नागरिकांनी रात्री अपरात्री वेळेस शेतात जाताना किंवा बाहेर जाताना काळजी घ्यावी व मळ्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी शक्यतो गोठ्याच्या आत बंद दरवाजात ठेवावे रात्री घराच्या बाहेर निघताना बॅटरीचा वापर करावे किंवा टाळावे* *प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा दुर्घटनेस सामोरे जावे लागेल या परिसरात शहरातील सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे तरी सुजाण नागरिकांना कळकळीची विनंती काळजी घ्यावी अशी सविस्तर माहिती* *श्री भागवत झाल्टे पत्रकार व माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष यांनी दिली आहे*
