
छ.संभाजीनगर(प्रतिनिधी ) शब्दमैफिलने सजली कविता संध्या(छ. संभाजीनगर)रोहिणी पब्लिकेशन प्रस्तुत, शिवछत्रपती महाविद्यालय इथे ‘शब्दमैफिल’ ओपन माईक शो मोठ्या उत्साहात दिनांक २०.०४.२०२५ रोजी संपन्न झाला.यावेळी छ. संभाजीनगरसह इतर जिल्ह्यातील व परीसरातील नवोदितसह नांमाकीत कवी यांची कवितांची सुरेख मैफिल रंगली. कवयित्री प्रतीक्षा तीतकारे, निवास, ऋषीकेश अव्हाळे आणि रेणुका गोल्हार यांनी आपल्या स्वमधूर व खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करत मैफिलीची रंगत वाढविली. दरम्यान,ओपन माईक शब्द मैफिल मध्ये कवी योगेश सोनवणे, जयश्री अहेर, राहुल साळवे, अर्णव जयंत, कृष्णा डांडनाईक, अनुराधा वाकळे, मंजुषा कवटेकर, अल्केश अडकिने, शुभम जाधव, विक्रम जाधव, ताजकृष्ण वाघमारे, वैश्नवी जाधव, कृष्णा भालेराव, स्नेहा खोडके, रेणुका गोल्हार, गीता खरात, ऋषिकेश अव्हाळे, देवन्त खांडखुळे, सचिन पवार, आदित्य गोमटे, सागर थोरात, अरुण महाजन, पूजा चव्हाण, हरिओम देशमुख आणि प्रिया सोनवणे यांनी आपल्या कवितांनी सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व टिम याचे योगदान मोलाचे ठरले. सदर कार्यक्रमात डॉ.वैजनाथ कदम सरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली,तर रोहिणी पब्लिकेशन च्या सर्वेसर्वा कुमारी. रोहिणी माया रामू वाघमारे मॅम यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रोहिणी प्रकाशन मुंबई प्रस्तुत ‘शब्द मैफिल ओपन माईक शो’ कार्यक्रमास छ. संभाजीनगर येथील प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला.लिखाण: कुमारी – रेणुका विनोद गोल्हार
