
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८५ वा दिवस सत्व, रज आणि तम हे गुण कमीअधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीअधिक प्रमाणात ब्राह्मणाचे, क्षत्रियांचे, वैश्याचे व शुद्राचे गुण उपजतच असतात. दिवसभरात व्यक्तीने केलेल्या विविध कृतीतून त्याच्यातील विविध गुणांचे अविष्कारण होत असते, मात्र कधीकधी एक किंवा दुसर्या गुणांचा प्रभाव कमी अधिक होतो आणि माणसाच्या कर्मातून तो प्रकटही होतो. व्यक्तीचे श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्मावरुन नाही तर त्याच्या कर्मावरुन ठरविणे आवश्यक आहे.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३ वैशाख शके १९४७
★ चैत्र वद्य/कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २३ एप्रिल २०२५
★ १५६४ जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार विल्यम शेक्सपियरचा जन्मदिन आणि तसेच १६१६ मृत्युदिन हा जगातील विलक्षण, दुर्मिळ योग म्हणावा लागेल.
★ १८५८ संस्कृत पंडित, विधवा स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या समाजसेविका पंडिता रमाबाई यांचा जन्मदिन.
★ १८७३ अस्पृश्यतानिवारणाचे काम करणारे थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्मदिन
★ जागतिक ग्रंथदिन तथा रचनास्वायत्य दिन.
