
धुंद करणारा ओल्या गवताचा गंधवैशाखाच्या मशागतीनंतर शेतकरी जसा मृगाच्या सरींची आतुरतेने वाट पाहतो आणि पहिल्या सरी नंतर मृदगंधाने आसमंत धुंद होऊन जातो तद्वतच कवयित्री मनिषा मिसाळ यांच्या पहिल्या कविता संग्रहाची मी आतुरतेने वाट पाहत होते.तो कवितासंग्रह हातात पडल्यानंतर वाचून काढला आणि त्यांच्या शब्दगंधाने धुंद होऊन गेले.गंध ओल्या गवताचा हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह असला तरीही तो वाचताना कवयित्रीचं नवखेपण कुठंही आढळत नाही.त्या दुष्काळी भागातील असल्या तरी शब्दांचा मात्र सुकाळ आहे.कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका ही मोहमयी जगात राहून देखील माय मातीशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे हे अधोरेखित करते.शेती मातीवर जीवापाड प्रेम करणारे पाठ्यपुस्तकातले कवी हनुमंत चांदगुडे यांची प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हिरव्या शुभेच्छा आणि अलका कुबल ताई यांच्या माहेरच्या साडीच्या तलम ,मऊ , उबदार स्पर्शाने मुग्ध झालेला ओल्या गवताचा गंध नक्कीच आसमंत व्यापून टाकेल आणि वाचकांना आकर्षित करेल यात शंकाच नाही. अभिनय क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांना त्यांच्या गावाबद्दल आत्यंतिक ओढ आहे.तिथला दुष्काळ पाहून त्यांच काळीज अगदी पिळवटून निघते.त्या लिहितात मुकी ढोरं चाऱ्याविनादीनवाणी हंबरत राहीअन् धन्याच्या जीवाचीतगमग मात्र होई’माणचा दुष्काळ’ या कवितेत दुष्काळाचं भीषण वास्तव मनिषा ताईंनी मांडलय.शेतकऱ्याला कधी ओला कधी सुका दुष्काळाशी सामना करावा लागतो.सततच्या नापिकीमुळे त्याच्या पाठीचा कणा पार मोडून जातो.अस्मानी-सुलतानी संकटांशी तोंड देत, कर्जबाजारी होऊन शेवटी तो जीवन संपवतो.यावरुन मनिषा ताई ह्या गाव, शेतकरी यांच्याशी किती जोडलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांबद्दल वाटत असणार आदर, आपुलकी आहे हे कळून चुकते.त्या वरवरचं लिहीत नाहीत.त्यांच लिखाण त्या साहित्य क्षेत्रात नवख्या असूनही अंतराला भिडते हे काव्यसंग्रह वाचताना पदोपदी जाणवते.मनिषा ताई ह्या चित्रपटसृष्टीतील झगमगाट यापासून कोसो दूर आहेत आणि समाजाशी एकरूप आहेत हे ‘बायकोचं लफडं’या कवितेतून स्पष्ट दिसून येते.सध्या सामाजिक प्रदुषण फार वाढलंय.पति-पत्नी एकमेकांशी एकनिष्ठ नाहीत.विवाहबाह्य संबंधात झपाट्याने वाढ होताना समाजात दिसून येते.मुलाबाळांचादेखील विचार केला जात नाही.घरादाराची अब्रू तर जातेच पण आयुष्य उध्वस्त होते क्षणिक लालसेपोटी! होती आपली गरिबी तुला मात्र सुखी केलं या त्यांच्या ओळी बायकोवर नितांत प्रेम करणारा नवरा उजागर करतात.मनिषा ताई ह्या आधुनिक विचारसरणीच्या आहेत.त्या बोकाळत चाललेल्या अंधश्रद्धाळू समाजावर कोरडे ओढण्यास विसरत नाहीत.भोंदूबाबा, जादूटोणा,करणीकवटाळी ही सुशिक्षित समाजाला लागलेली एकप्रकारची कीड आहे हे अंधश्रद्धा या कवितेत ठणकावून सांगतात.एकूण ५५ कवितांचा हा कविता संग्रह आशय आणि विषय सौंदर्यानं नटलेला आहे.कवयित्रीची भाषा ही साधी,सरळ आहे.कवितेत कुठंही तोचतोचपणा आढळत नाही.बालपणीच्या आठवणी जागं करणार आकर्षक असं मुखपृष्ठ पुस्तक हातात पडताक्षणी लक्ष वेधून घेतं.कवयित्रिचा शब्दांचा मळा दुष्काळातही बहरत राहो! सर्वच कविता ह्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत आणि त्या प्रत्येकाने वाचल्या पाहिजेत.मनिषा ताईंना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!अभिप्राय
-विद्या सरपातेकाव्यसंग्रह -गंध ओल्या गवताचा कवयित्री -मनिषा मिसाळ प्रकाशन -परिस प्रकाशन पुणे मूल्य -१७०पृष्ठ- १८०
