
, नाशिक (प्रतिनिधी ) नाशिक वरून मुंबईत चाकरमान्यांना दररोज घेऊन जाणारी पंचवटी एक्सप्रेस… जणू आपल्या सोबत संस्कृती आणि परंपरा घेऊन सदैव मानवतेच्या मार्गांवर अग्रेसर असते. बुद्धिमत्तेचे हिमालय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पंचवटी एक्सप्रेस मध्ये साजरी करण्यात आली. महापुरुषांच्या विचारांनी अवघे विश्व समृद्ध झाले आहे. मानवतावादी विचारावर चालून अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडत विचार ज्योतीने अवघे विश्व उजळून टाकणाऱ्या महामानवांना या प्रसंगी अभिवादन करण्यात आले.अवघड असा कसारा घाट उतरत असताना अनेक अंधारमय बोगदे लागतात या अंधाराला चिरत जात पंचवटी एक्सप्रेस रोज नव्या स्थानाकावर प्रवाश्यांना घेऊन येते. आजचा प्रवास हा जयंती साजरी करण्याने तेजोमय झाला. अंधारातून उजेड पेरत जाताना विचारांचा वारसा घेत अनेक वाटा उजळून निघाल्या.मागील महिन्यात रमजान पर्वात इफतीयार पार्टी करून सर्वधर्म समभाव हा सदभावनेचा संदेश देत ऑनव्हील ऐकतेचे रूप पंचवटी मध्ये बघण्यास मिळाले

आणि आता अत दीप भव मन्हत संविधानाचा जागर करीत पंचवटी मार्गस्थ झाली.पंचवटी एक्सप्रेस केवळ एका ठिकाणा वरून गंतव्य स्थाना पर्यन्त वहन करणारी रेल्वे कोचेस पुरती मर्यादित राहिली नसून आपुलकी आणि माणुसकीचा अनोखा संगम या ट्रेन मध्ये होत असतो. केवळ नावापुरती ही गाडी नाही तर ती एक वैचारिक आणि सांस्कृतिक धरोहर आहे. नाशिक शहर व परिसरातील अनेक लोंकाची ने आन करता करता एक दर्जा पंचवटी ने टिकून ठेवला आहे. महामानवांच्या विचाराचा वारसा या ट्रेन मार्फत जपला जातो आहे याचा आंनद वाटतोय.
