

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७९ वा दिवस* नराचा नारायण होणे म्हणजे मानव तत्त्वाची परिपूर्ण अवस्था होय. मनुष्याच्या ठिकाणी जन्मताच वास करून असलेले पूर्णत्व आकारास आणणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या योगे त्याच्या सामाजिक अस्तित्वातून प्रकट होणारे सद्गुण, सदाचार, सद् विचार हर्ष व आनंद प्राप्त करून घेणे, सुनियोजित व कार्यक्षम अशा शिक्षण पद्धतीतून नवसमाजाची निर्मिती होणे. त्यांच्यात धर्म, करुणा, वास्यल्य, आत्मसाक्षात्कार, दैवी आनंदाच्या प्राप्तीची उच्चतम अवस्था गाठणे. आपल्या देशातील दीनदुबळ्या गरीब लोकांविषयी करुणा त्यांच्या उपाशी तोंडात भाकरीचा घास भरवण्याची वृत्ती सर्वसामान्य लोकांना ज्ञान देण्याची तळमळ समस्त मानव जातीवर प्रेम आपल्या देशावर अत्यंतिक प्रेम ही मानवाची परिपूर्ण अवस्था म्हणावी लागेल. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २७ चैत्र शके १९४७*
★ चैत्र वद्य/कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १७ एप्रिल २०२५
★ १४७९ हिंदी भाषेतील थोर कवी व श्रेष्ठ कृष्ण भक्त कवी सूरदास यांचा जन्मदिन
★ १९५० बॅरिस्टर मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु झाले.
★ १९५२ भारतीय संविधानानुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रीय काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले व पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
★ १९७५ थोर तत्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


