
करंजगाव (प्रतिनिधी ) टि. डे.क. कंपनी व नासिक रन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने जनता विद्यालय करंजगाव येथे मुलींसाठी अद्यावत स्वच्छतागृह बांधकाम भूमिपूजन संस्थेचे सभापती बाळासाहेब आप्पा क्षिरसागर व निफाड तालुका संचालक शिवाजी पाटील गडाख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पावशे., शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक राजोळे सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

