
*नाशिक ( प्रतिनिधी)नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा काढण्याचे काम सुरू असताना रात्री एक जमाव काठे गल्लीच्या दिशेने चालत आला. जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली यात चार अधिकारी आणि सुमारे 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या जखमी पोलिस कर्मचाऱ्यांचे उपचार नाशिक शासकीय रुग्णालयात सुरू असून त्यांची भुसे साहेबांनी भेट घेऊन विचारपूस केली.

तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासित केले.*मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरवात झाली. प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर हा अचानक हल्ला झाला. रात्रीच्या जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

अनधिकृत दर्गा काढण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांचे काम सुरू होते. असे असताना बेछूट दगडफेक करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर बाब असून असे वर्तन करणे चुकीचे आहे. या घटनेचा खोलात जाऊन तपास केला जाईल. या घटनेच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल.
