
सिन्नर (प्रतिनिधी ) शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच धोंडवीर नगर* आयोजित..क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा एक नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला..यावेळी धोंडविरनगर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते 11 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता फुले स्मारकाला युवा नेते उदय भाऊ सांगळे यांचे उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजेपासून ढोल पथकाच्या गजरात व शालेय विद्यार्थी युवा युवती यांच्या विविध भारतीय संस्कृतीच्या पेहराव /महामानवांचे वेशभूषा मध्ये मिरवणूक काढण्यात येऊन फुलेंना व आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले

सायंकाळी सात वाजता युवा- संमेलन… संवाद सत्र व सिन्नर तालुक्यातील महाराष्ट्र पुरोगामी जेष्ठ विचारवंतांचा सन्मान सोहळा पार पडला* यात…कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत थोरले पेशवे बाजीराव पतसंस्था डुबेरे चे संस्थापक चेअरमन मा. नारायण शेठ वाजे त्यांनी भूषविले सन्मान सोहळ्याचे मानकरी… शिवश्री मा.प्रा.डि.डि. गोर्डे अण्णा,मा. महामित्र दत्ताजी वायचळे, शिवश्री मा.प्रा. राजाराम मुंगसे सर, मा.प्रा.के.आर. वेलजाळी सर संवाद सत्रातील अतिथी…मा. नारायण शिरसागर (उद्योजक) मा.डॉ.सौ. सुजाता लोहारकर, मा.डॉ. भरतजी गारे,मा.डॉ. विष्णू अत्रे व मा. भारत सोनवणे साहेब (सी.ए.)प्रमुख पाहुणे:- धोंडवीर नगर सरपंच/उपसरपंच, सदस्य, त्याचप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल आप्पा उगले,इलाही शेख, अरुण शेठ वारुंगसे ,हरिभाऊ तांबे, सुभाष कुंभार, संजय गंगावणे, मनीषा मुरकुटे, जी. प. शाळा मुख्याध्यापक सोमनाथ वाळुंज उपशिक्षक दराडे सर, दुबेर चे पोलीस पाटील रामदास वारुंगसे धोंडवी नगरचे पोलीस पाटील बाळासाहेब पवार त्याचप्रमाणे बारा बलुतेदार महासंघाचे सिन्नर तालुका अध्यक्ष किरण भाऊ कोथमीरे ,शहराध्यक्ष विनोद भाऊ शितोळे ,किरण भाऊ जाधव, विजय मोरे ,मनोज वाजे ,आदी मान्यवर उपस्थित होते**उपस्थित पाहुण्यांचे स्वागत धोंडवीर नगर मधील युवतींनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल पवार तर सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णा सोनवणे सरांनी केले कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रतिमापूजन व ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत मा. म. देशमुख व मा. हरी नरके यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली उपस्थित संवाद सत्रातींचा परिचय श्रुतिका पवार ,भाऊसाहेब पवार ,धनश्री पवार, संस्कृती पवार यांनी परिचय करून दिला**संवाद सत्र प्रश्नोत्तराच्या तासाने अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला यामध्ये प्रश्नोत्तर स्वरूप होते ग्रामस्थ महिला व युवतींनी प्रश्न केले संवाद अतिथींनी त्यांना उत्तरे दिली.

अतिशय नाविन्य पूर्ण असाच हा कार्यक्रम होता यामध्ये श्रुतिका पवार, श्रावणी पवार, प्रगती माळी, संस्कृती पवार, धनश्री पवार, साक्षी पवार, तेजस्विनी पवार ,ईश्वरी पवार ह्या युवतींनी प्रामुख्याने भाग घेतला व उपस्थित संवादॴतिथीं त्यांना खूप समर्पक अशी उत्तरे दिली**माननीय नारायणजी शिरसागर यांना बहुजनांच्या तरुणांनी उद्योगशील शेती कशी करावी व व्यवसायामध्ये कशा प्रकारे आकर्षित व्हावे यासंदर्भात तसेच उद्योग व्यवसायातील बँक लोन, बहुजन समाजातील तरुणांचे खरे हित, शेती एक उद्योग या विषयावर चर्चा केली तर डॉक्टर लोहारकर, डॉक्टर अत्रे ,डॉक्टर गारे यांनी रुग्णांची वाढत असलेली झपाट्याने वाढ, स्त्रियांच्या आजाराविषयी चर्चा ,शारीरिक स्वास्थ्य उत्तम ..कशा प्रकारे राहू शकते, पती-पत्नीतील संपत आलेला संवाद… व त्यांच्या सुखी आयुष्याची गुरुकिल्ली… या संदर्भात मार्गदर्शन केले ,तर… माननीय भरतजी सोनवणे यांनी व्यवसाय उभारणी संदर्भात ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायाकडे का वळावे यासंदर्भामध्ये मार्गदर्शन केले यानंतर उपस्थित मान्यवरांचे *महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा समिती, धोंडवी नगरच्या वतीने सत्कार करण्यात आला**सन्मान सोहळ्यांचे मानकरी यांना सन्मानचिन्ह वृक्ष व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले!**यावेळी सन्मान सोहळ्याला उत्तर देताना माननीय गोर्डे अण्णांनी धोंडवीर नगरचा उल्लेखनीय उद्गार काढत पुरोगामीत्वाची चळवळ खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात आजही टिकून असल्याचे स्पष्ट करत आपल्या रंगकर्मी अभिनयाने औरंगजेबाचे काही डायलॉग सादर केले, तर महामित्र दत्ताजी वायचळे यांनी कर्मकांडावरती, मुंगसे सरांनी संभाजी महाराजांवरती व वेलजाळी सरांनी हरी नरकें सरां वरती आपली मत प्रदर्शित केली प्रमुख पाहुण्यांच्या वतीने सुभाष जी कुंभार यांनी मा. म.देशमुख यांचे विचार व संभाजी ब्रिगेड करत असलेली कार्य या संदर्भात मत व्यक्त केले त्याचप्रमाणे विठ्ठल आप्पा उगले यांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून अतिशय स्तुत्य उपक्रम… सोहळा समितीने आयोजित केला याबद्दल गौरव केला.यावेळी धोंडवीर नगर मधील शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांना सन्मानित करण्यात आले यात कुमारी सुषमा सुभाष पवार हिची सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण होत क्लास टू सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली, अक्षय सोनवणे भारतीय युवा अधिकारी, अश्विनी बाळू सोनवणे सीईए जलसंपदा विभाग, मनोज संजीव पवार व मिलिंद संजीव पवार या दोन्ही भावांची अनुक्रमे महसूल सहाय्यक मुंबई व सहाय्यक कार्यकारी अधिकारी बीएमसी येथे नेमणूक झाली, ज्ञानेश्वर पवार यांची भारतीय प्रतिभूती मुद्रानालय नाशिक या ठिकाणी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांनाही स्मृतीचिन्ह, पुस्तक देऊन गौरविण्यात आले*सरते शेवटी नारायण शेठ वाजे यांचे अध्यक्षीय मनोगत यामध्ये त्यांनी धोंडवीर नगर मधील युवकांचे कौतुक करत अतिशय सन्मानपूर्वक आमचे आदरातीत्य केले व अतिशय नाविन्यपूर्ण असा तालुक्यातही न झालेला संयुक्तिक जयंती सोहळा साजरा केला त्याबद्दल गौरव उदगार काढले व यापुढे धोंडविरनगरच्या तरुणांना नेहमी मदत करण्याचा शब्द दिला*राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाची संकल्पना:-धोंडवी नगरचे माजी सरपंच भाऊसाहेब पवार यांनी आयोजिली होती! कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील सर्व युवा-युवती ग्रामस्थ, ग्रामपंचायत व संयुक्त जयंती सोहळा उत्सव समितीने प्रयत्न केले!
