सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७८ वा दिवस मानव जातीचे अंतिम लक्ष म्हणजे मोक्ष प्राप्त करणे, मुक्ती मिळविणे होय. याचा निःस्वार्थ कर्माच्याद्वारे लाभ करून घेणे हाच ‘कर्मयोग’ होय. आणि म्हणूनच प्रत्येक स्वार्थपूर्ण कार्य त्या चरम अवस्थेप्रत पोहोचण्याच्या आपल्या गतीला अवरोध करीत असते, याउलट प्रत्येक निःस्वार्थपणे केलेले कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असते. एवढ्यासाठी नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की, जे जे म्हणून स्वार्थपर ते ते नीती विरुद्ध आणि जे निःस्वार्थपर तेच नीतिसंगत होय.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २६ चैत्र शके १९४७
★ चैत्र वद्य/कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १६ एप्रिल २०२५ ★ संकष्ट चतुर्थी
★ १८५३ भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली.
★ १८८९ जगप्रसिद्ध विनोदी अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार चार्ली चॅप्लिनचा जन्मदिन.
★ १९४८ राष्ट्रीय छात्र सेनेची (NCC) स्थापना दिन.
★ जागतिक ध्वनी दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक


