
नाशिक ( प्रतिनिधी) – सविता बहुउद्देशीय क. संस्था तथा सांस्कृतिक मंडळ व किम्स मानवता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील अठरा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी फेस्कॉनचे अध्यक्ष अशोक होळकर, डॉ. राज नगरकर, डॉ. संघवी, डाॅ. सिंग यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रसंगी सचिव धनंजय चतुर, क्षीरसागर, शिवाजी मुरलीधर होळकर, विजय राऊत, शिवाजीराव पाटील अनंत नागवंशी, अनिता भामरे, कौसल्या मुलाने पुष्पलता ठाकूर, मधुकर बाविस्कर तसेच फिल्म इंडस्ट्रीतल्या कलाकार, सगुना फाउंडेशनच्या अध्यक्षा, व पदाधिकारी, तसेच कालिका माता संघाच्या महिला पदाधिकारी, द्वारका आनंदी भजनी मंडळ, विविध संस्था व संघटनांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सविता बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री सविता चतुर, व डॉ. राज नगरकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पंधरा हजार रुपयांपर्यंतचे आरोग्य तपासणीचे कुपन देऊन कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचलन संस्थेच्या खजिनदार वैशाली निलेश खैरे यांनी केले. तर आभार विश्वानंद साळवे यांनी मानलेत. प्रसंगी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थितांनी प्रशंसा केली.
