
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात सेवानिवृत्त होत असलेले श्री भास्कर गांगुर्डे व चिंधु गांगुर्डे यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा करताना उपसभापती मोगल, संचालक गडाख,प्राचार्य दवंगे व आदी
कसबे सुकेणे( प्रतिनिधी) मविप्र संस्थेला मोठे करण्यात अनेकांचा वाटा असून त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षकेतर शिपाई वर्ग खऱ्या अर्थाने संस्थेला मोठे करण्यात त्यांची भूमिका मोलाची असून शिक्षकेतर सेवक संस्थेची सेवा आईसारखी करतात असे प्रतिपादन संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्त होत असलेले भास्कर गांगुर्डे व चिंधु गांगुर्डे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक शिवाजी आप्पा गडाख होते यावेळी उपसभापती मोगल यांनी शिक्षकेतर सेवकांचे कौतुक करत शाळेत सर्वात प्रथम येणारा घटक व सर्वात उशिरा जाणारा घटक स्वच्छता हे दैवत मानून हा घटक सदैव कार्यरत असल्याची प्रतिक्रिया दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी आप्पा गडाख यांनी शिक्षकेतर सेवक शाळेची स्वच्छता राखून विद्यार्थ्यांना एक प्रकारे सुसंस्कृत बनवतात संस्थेला वाढवण्यात त्यांचाही मोठा हातभार आहे असे प्रतिपादन केले सुरुवातीला 40 वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त होत असलेले भास्कर गांगुर्डे व 33 वर्ष सेवा करून निवृत्त होत असलेले चिंधु गांगुर्डे यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रास्ताविक प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले यावेळी विद्यार्थिनी सिद्धी वडघुले अभिनवचे मुख्याध्यापक राहुल मोगल, ज्ञानेश्वर वाघ,सोमनाथ मत्सागर, मुकुंद ताकाटे, माजी मुख्याध्यापक आनंदा शिंदे श्री भास्कर गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्रीम योगिता चव्हाण व श्रीम वैशाली करंजे यांनी तर आभार श्रीम प्रीती मोरे यांनी मानले कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक राजेश खताळ, राजेंद्र धनवटे, माजी मुख्याध्यापक सूर्यभान भोज, शांताराम गायकवाड, आर जी ढिकले, बी व्ही शिंदे, आदींसह संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, नातेवाईक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
