
वडांगळी.(प्रतिनिधी). मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात आज मंगळवार दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आडगाव यांच्या व न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी या दोन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमाने आज वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश भाऊसाहेब खुळे, अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेबजी चव्हाणके ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष खंडेराव गणपत खुळे, ज्येष्ठ सभासद कचरू महादू चव्हाणके शालेय समिती सदस्य शांताराम बापू कोकाटे, युवा सभासद विक्रम माधवराव खुळे, दैनिक लोकनामाचे उपसंपादक व मविप्रचे सभासद राजाराम भगवंता खुळे, विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खैरनार , पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख विलास तांबे, अभिनव बाल विकास मंदिर प्रमुख शीला आवारे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खैरनार यांनी शिबिराचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकात केले. शिबिराचे उद्घघाटन फीत कापून सुदेश दादा खुळे यांच्या हस्ते करण्यात आले व भाऊसाहेब चव्हाणके यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. सदर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते. त्याचप्रमाणे या शिबिरासाठी आशा सेविका भारती अशोक घेगडमल, रेखा अनिल अढांगळे, सुरेखा योगेश खुळे, मुक्ता सुरेंद्र काहांडळ, सुवर्णा दत्तात्रय खुळे त्याचप्रमाणे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय पथकातील डॉ. यशवी पारेख, डॉ. स्नेहा काळे, डॉ.लौकीक पेशट्टीवार, समन्वयक रवि सोनवणे, महेंद्र घोटेकर ,सदस्य सहकारी म्हणून मनिषा सोनवणे, निकिता कापडणीस उत्तम साठे आदी उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदेश दादा खुळे म्हणाले की, मला दहावीत असतानाच नंबरचा चष्मा लागलेला आहे. त्यामुळे मला डोळ्यांचे महत्त्व कळले आहे. तुम्हीही आपल्या डोळ्यांना जपा व आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी करून घेत जा. तपासणी केल्यानंतर आपल्या मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची कुठलीही मदत आपणास लागली किंवा हवी असल्यास आम्हाला तात्काळ संपर्क करा . असे आवाहन सुदेश दादा खुळे यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी, सरचिटणीस अॅड.नितीनभाऊ ठाकरे तालुका संचालक कृष्णाजी भगत साहेब यांनी सिन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा मानस केला आहे . त्याचाच भाग म्हणून आज आपल्या विद्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे .त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले व आभार प्रदर्शन संदीपराव म्हस्के यांनी केले. यावेळी या शिबिरास प्रचंड प्रमाणात प्रतिसाद लाभला. जवळ जवळ १५०रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक यांनी संयोजन व नियोजनामध्ये हातभार लावून शिबिर यशस्वी केले.
