
मुळाणे ( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय मुळाणे विद्यालयात आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी *भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षीयस्थानी शालेय समितीचे मा.दिलीप नाना रौंदळ हे होते. मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रविंद्र पगारे स्कूल कमिटी सदस्य तसेच गावाचे सरपंच उपसरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते.विद्यालयाचे शिक्षक श्री.आबा अहिरे यांनी प्रस्तावना केली.व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.त्यानंतर शालेय विद्यार्थी जान्हवी खरे वर्षा आढाळे दुर्गेश्वरी पवार आढाळे प्राची यांनी आपले विचार व्यक्त केले.तसेच काही मुलींनी सामूहिक गीत व डाॅन्स सादर केले.शिक्षक मनोगतात श्री.गोकूळ वाघ सरांनी आपले विचार व्यक्त करत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंध जीवनकार्याचा परिचय करून दिला.त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.रविंद्र पगारे सरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची माहीती सांगत त्यांचे विविध उदा.सांगुन विद्यार्थ्यानी देखील तसा अभ्यास करावा असे आव्हान केले.शेवटी अध्यक्षीय भाषणात मा.दिलीप नाना यांनी आपले विचार व्यक्त केले.ते मानले विश्वात असा व्यक्ती आत्ता जन्म घेऊ शकत नाही.आपण देखील त्यांची प्रेरणा घेऊन आपले जीवन चांगले जगले पाहिजे. याप्रसंगी गावातील तरूणानी शाळेला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व बुध्दाचा फोटो भेट म्हणून दिला.याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक यतिन शेवाळे ,प्रशांत निकम, गोकूळ वाघ, दिपाली सावकार, उषा जगताप, मेघा भामरे ,ललीता बच्छाव,हर्षिता ठाकरे,भारती कदम, संदिप रौंदळ,सागर देवरे तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सञसंचालन आबा अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत निकम यांनी मानले.
