
लेखक:- शंकर नामदेव गच्चे, जालना
.डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी महीलांसाठी हिंदूकोड बील आणल.महीला सबल देश सबल,महीला स्वतंत्र देश स्वतंत्र महीला दुर्बल देश दुर्बल,महीला कमजोर देश कमजोर कारण गुलाम महीला गुलाम पोराला जन्म देतात आणि स्वतंत्र महीला स्वतंत्र पोराला जन्म देतात.म्हणून डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात” कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या महीलांच्या प्रगतीवरून मोजावी.”महीलांना बाबासाहेबांनी वडीलाच्या संपत्तीत अर्धा वाटा दिला.पत्तीच्या संपतीत अर्धा वाटा दिला.या देशातल्या ब्राम्हणी व्यवस्थेने सांगितलं स्त्री ही कायमची गुलाम,पायातली वाहान,भोगवस्तू,दासी,लहानपणी पित्याच्या आधीन तरूणपणी पत्तीच्या आधीन आणि म्हातारपणी मुलाच्या आधीन.बाबासाहेबांनी सांगितलं घाबरू नकोस तू स्वतंत्र आहेस.व्यस्थेन सांगितलं पोटाला कुंकु लावून लग्न.म्हणजे पोरग पोरगी पोटात असताना लग्न व्हायची.पुन्हा त्यांनी सांगितलं पाळण्याला बाशिंग.बाबासाहेबांनी सांगितलं मुलाच वय २१ आणि मुलीच वय १८ केल.का?तिला लग्न म्हणजे काय?प्रेम म्हणजे काय?नवरा म्हणजे काय?गर्भधारणा म्हणजे काय?मुलाला जन्म कसा दयाचा.संस्कार कसे करायचे हे कळल पाहिजे.व्यवस्थेने सांगितलं पत्तीला परमेश्वर मान दारूड्या अशा सू दे,जुगार्या असू दे,जाळणारा असू दे,छळणारा असू दे,मारणारा असू दे.बाबासाहेब म्हणाले,पत्तीला परमेश्वर नाही मिञ मान.दारूड्या,छळणार्या,जाळणार्या नवर्याला घरात घेऊ नको. व्यवस्थेने सांगितलं हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेर्या मार.दारूड्या,जुगार्या,गंजाड्या,बाहेरख्याली,छळणारा,जाळणारा,मारणारा कीती जन्मी सात जन्मी.बाबासाहेब म्हणले अस असेल तर सोडून दे.त्यांनी सांगितलं लग्न झाल्यावर मुल होत नसेल तर ती वांझ आहे.तिला समारंभाला जाऊ देऊ नका.तिच्या हातात दुसर्याच लेकरू देऊ नका.बाबासाहेबांनी सांगितलं बाई तू घघाबरू नको तू मुलाला दत्तक घे.एखाद्या महीलेचा नवरा वारला तर त्यांनी सांगितलं की तिला पांढरी साडी द्या.साधं अन्न खायाला द्या,तिला लग्न समारंभाला पाठवू नका.एकलकोंडे जीवन जगू द्या.बाबासाहेब म्हणले घाबरू नकोस दुसर लग्न कर.विधवा पुनर्विवाहचा कायदा केला.व्यस्थेने सांगितलं मुलगी शिकली आणि भात केला तर आळ्या होतात.हाचखरा दहशतवावाद आहे.बाबासाहेब म्हणाले शिक आळ्या झाल्यावर पाहू.ही व्यवस्था केली महीलांना.वडाच्या झाडाला फेर्या मारायला लावल्या मग फुले म्हणतात एखादा तरी नवरा असा हाय का?निदान एखादी तरी फेरी बाभळीच्या झाडाला मारतो.हीच बायको निदान ह्या जन्मी तरी राहू दे.साली पहीली मेल्यावर दुसरी पंधरा दिवसात करतय.आणि लोकांनी विचारलं तला म्हणतयं पोरासाठी केली.सोयी नुसार तत्त्वज्ञान आहे.नवरा मेला तर महीलेला चित्तेवर जावं लागत होत.पण पत्नी मेल्यावर एक तरी पुरूष सती जात होता काय?हे सर्व अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महीलांना मिळवून दिले.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे १९४२-१९४६ या काळात इंग्रजांच्या(व्हायसराॕयच्या )मंञीमंडळात चार कॕबिनेट खात्याचे मंञी होते.उर्जा खाते,सिंचन,सार्वजनिक बांधकाम विभाग,मजुर मंञी.बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांकडे मागायला गेले नाहीत.बाबासाहेबांच्या विद्वतेवर ही चार कॕबिनेट खाती इंग्रजांनी त्यांना दिली.या काळात बाबासाहेबानी जी काम केली त्यात बाबासाहेबानी आठ धरण स्वतः उभ राहून बांधून घेतली.महानदी प्रकल्प,भाक्रानानगल,कोसी प्रकल्प पुढे ही संख्या १५ धरणापर्यंत गेली.ते पाणी त्या राज्यांना सिंचनासाठी उपलब्ध झाल.आणि बसणार्या पुराच्या फटक्यापासून बिहार,पश्चिम बंगाल,उत्तर प्रदेश या राज्यांची सुटका झाली नंतर पंडीत नेहरु सरकारमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ‘पाणी बील ‘मांडल,आणि नेहरूना सांगितलं नेहरुजी उत्तर भारताची व्यवस्था मी केली आहे पण दक्षिण भारतात दर पाच वर्षाला मोठा दुष्काळ पडतो.त्यासाठी आपणाला एक नदीजोड प्रकल्प राबवायचाआहे.तेव्हा या देशात ५०० वर्षे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.आणि उत्तर भारतातील गंगा,यमुना,सिंधू या नद्यांच समुद्राला वाहून जाणार पाणी दक्षिण भारतात न्यायच आहे.या पाण्यामुळे तीन फायदे होतील अस बाबासाहेबानी सांगितलं.पहीला फायदा सांगितला जनतेच्या हिताचा,प्रजेच्या हीताचा हे पाणी आपणाला शेतीला वापरता येईल,शेतकरी बागायतदार होईल.दुसरा फायदा बाबासाहेबानी सांगितला हे पाणी आपण नेणार आहोत त्या पाण्यावर प्रत्येक १०० की.मी.अंतरावर एक वीज पाॕवर स्टेशन आपण उभ करू.त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवाला वीज मिळेल.उत्पनाला ती कारणीभूत ठरेल.आणि तिसरा फायदा बाबासाहेबानी सांगितला दिल्ली ते महाराष्ट्र जवळपास पंधराशे की.मी.अंतर असल्यामुळे दिडशे पाॕवर स्टेशन निर्माण होउन वीजेचा प्रश्न कायमचा निकाली निघेल आणि आज जे १६-१६तासाच लोडशेडींग आहे ते दिसल नसत.कुणाच्या हीताचा निर्णय होता ?प्रजेच्या हीताच बील होत पंडीत नेहरून त्याला मान्यता दिली नाही बाबासाहेबानी नौकरदारांसाठी चौदा तासावरून कामाचे आठ तास केले.डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिझर्व्ह बँक आॕफ इंडियाच्या स्थापनेत सिंहाचा वाटा आहे.महीलांसाठी सहा महीण्याची प्रस्तुती व बालसंगोपणासाठी रजा मान्य केली.हे कुणाच्या हीताचे निर्णय आहेत ? बाबासाहेब आंबेडकर संसदेत असताना समता निर्माण होत नाही हे बाबासाहेबांच्या लक्ष्यात आल.म्हणून बाबासाहेबानी “सामुहीक शेती “बील मांडल.कारण आपल्या देशात प्रचंड विषमता आहे.कोणाकडे हजार एकर जमिन,कुणाकडे ५०० एकर जमिन,कुणाकडे २०० एकर जमिन तर कुणाकडे काहीच नाही म्हणून त्यांनी सांगितलं सगळी शेती एकञ कराआणि त्या शेतीवर शेतकऱ्यांना साठ वर्षासाठी नौकरी द्या.आणि ६० वर्षानंतर त्याला पेंशन लागू करा.कुणाच्या हीताचा निर्णय होता?सामुहीक शेतीच बील सुध्दा त्यावेळच्या नेहरू सरकारन मंजूर केल नाही.बाबासाहेबानी लोकहीताची प्रजेच्या हीताची २६४ बील मांडली.आताचे खासदार एकही बील मांडत नाहीत पण डीबेटींग चालू असताना झोपतात असे लोक जर निवडून जात असतील तर खरच प्रजेच राज्य येईल का?obc उध्दारक डाॕ.आंबेडकर बाबासाहेबानी obc च्या आरक्षणाच बील मांडल.त्याला सरदार वल्लभाई पटेल यांनी विरोध केला.ते म्हणाले “हे obc कोण आहेत आम्ही तर sc,st लाच मागासवर्गीय समजतो”. बाबासाहेबांना समजलं की OBC च्या आरक्षणाला विरोध होणार म्हणून बाबासाहेबानी obc च्या सर्व नेत्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं मी sc आणि st साठी आरक्षणाचा ड्राफ्ट तयार केला आहे.मला obc च्या आरक्षणाचा ड्राफ्ट तयार करायचा आहे.पण मी obc नसल्यामुळे मला तुमच्या आरक्षणाची मागणी करता येणार नाही म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे.त्यावेळेस obcचे नेते म्हणाले,”आम्हाला मांगा महाराच्या पंक्तीला बसायचं नाही,आम्हाला सध्या आरक्षणाची गरज नाही.” पण बाबासाहेब दूर दृष्टीचे होते.त्यांनी विचार केला मराठा समाज जरी जमिनदार असला तरी सर्व मराठा बांधवांकडे जमिनी नाहीत.obc जमिनदार असला तरी सर्व obc बांधवांकडे जमिनी नाहीत.अशा लोकांसाठी बाबासाहेबानी ३४० कलम लिहील आणि जेव्हा यांना आरक्षणाची गरज पडेल तेव्हा त्यांची खानेसुमारी काढावी व त्यांना आरक्षण द्याव अशी घटनेत नोंद केली. काही लोक म्हणतात कुठ काय केल आमच्या साठी मिञानो पंजाबराव देशमुख आणि डाॕ.आंबेडकर मिञ होते.पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे भेट घेण्यासाठी गेले.त्यावेळी obcचा ड्राफ्ट तयार केलेला होता .पंजाबराव देशमुख आमचा मराठा समाज obc त टाका हे सांगण्यासाठी आलेले होते.बाबासाहेब म्हणाले या दादासाहेब बाबासाहेब पंजाबरावांना दादासाहेब म्हणायचेआणि पंजाबराव बाबासाहेबाना बाबासाहेब म्हणायचे.मोठ्या माणसाना जात,पात धर्म नसतो.आपल्याकडे गल्लीबोळात जात,पात धर्म असतो.मोठी माणस तशी नसतात ती प्रजेची असतात.आणि बाबासाहेब पंजाबरावांना म्हणाले दादासाहेब मी बसून बसून जरा थकलेला आहे,मी जरा फीरुन येतो.तुम्ही तो पर्यंत मी हा ड्राफ्ट तयार केलेला आहे त्यावर थोडी नजर फिरवा.बाबासाहेब बाहेर गेले पंजाबरावाने ड्राफ्टवर नजर फिरवली आणि डोळ्यातून टपटपा अश्रू गळायला लागले.तेवढयात बाबासाहेब आले आणि म्हणाले दादासाहेब तुमच्या डोळ्यात अश्रू पंजाबराव म्हणाले, “बाबासाहेब तुम्ही फार मोठ्या दिलाचे राजे आहात,खूप मोठ्या मनाची माणसे आहात.”बाबासाहेब म्हणाले,”मी अस काय केलय दादासाहेब”.पंजाबराव म्हणाले मी आपल्याकडे माझ्या मराठा समाजाला obc त टाका म्हणून सांगायला आलो होतो ते काम तुम्ही आधीच करुन ठेवलं आहे.म्हणून तुम्ही खुप मोठे आहात.मराठा समाज obc त असताना मग त्यांना आरक्षण का नाही ? हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.obc त ३७४३ जाती आहेत .मंडल आयोग लागू करताना तो १९९८ जातींनाच लागू केला आणि १७४५ जाती त्यातून उडवून लावल्या त्यात जाट,पटेल,गुजर,मराठा हे obc त होते पण त्यांना obc तून बाहेर काढल कुणी ?हा प्रश्न स्वतः ला विचारा आणि उत्तर शोधा.तेव्हाच तुम्हाला बाबासाहेब समजतील आणि प्रजेच्या राज्याची संकल्पना समजेल. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर एका ठीकाणी म्हणतात “जर का मी काँग्रेसशी जुळवून घेतल असत तर या देशाचा पंतप्रधान पंडीत नेहरु नाही,सरदार वल्लभाई पटेल नाही तर डाॕ.बाबासाहेब आंबेडकर झाला असता.”बाबासाहेबांच वाक्य आहे म्हणजेच काय बाबासाहेब कुठेही विकले गेले नाहीत.प्रजेची संकल्पना काय ही भुमिका मुळातुन त्यांनी मांडली.प्रजेची संकल्पना मांडत असताना,समतेची संकल्पना मांडतअसताना डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”जर का मला आणखी थोडस आयुष्य मिळाल असत तर छञपति शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मी लिहून काढीन”.स्वतःच्या मुखपञावर ‘जयशिवराय’या नावान बाबासाहेब सुरुवात करतात आणि मगच पेपर निघतो. शेतकऱ्यांचे कैवारी डाॕ,आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजेच राज्य आणण्यासाठी मुंबई विधान मंडळावर २५,००० शेतकऱ्यांचा पहीला मोर्चा काढला.का?तर त्या ठीकाणी इंग्रजांच राज्य असताना खोती पध्दत होती.त्यांना आजच्या भाषेत सावकारी म्हणतात.त्यामध्ये शेतकरी नाडला जात होता,पिळला जात होता.२५,००० शेतकरी बाबासाहेबांच्या मोर्च्याला येतात.मला एक प्रश्न पडतो बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीत जन्माला आले.त्या जातीत कोणालाही १०० एकर जमिन नव्हती,आजही नाही.तर मग प्रश्न असा पडतो वर्तमानपत्रातुन,व्याख्यानातुन, पाठ्यपुस्तकातुन सांगितलं जात बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे आहेत.मी तर अस म्हणेल की बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या प्रजेचे आहेत.म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजेच्या राज्यासाठी पहीला शेतकऱ्यांचा मोर्चा काढला.या पंचवीस हजार शेतकऱ्यांना संबोधित करताना बाबासाहेब म्हणतात,”तुमच्या प्रश्नांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरल पाहिजे,आणि रस्त्यावर उतरल्यावर फक्त थांबल नाही पाहिजे तर तुमचा प्रश्न तडीस लावण्यासाठी तुम्ही झटल पाहिजे आणखी एक गोष्ट बाबासाहेब म्हणतात मला शेतकऱ्याच पोरग पंतप्रधान झालेल पाहायचय. डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की “भारतीय शेती ही आजारी पडली आहे.शेतीसाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.शेतकर्याने शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण देउन उद्योगधंदा सुरु करायला सांगितलं पाहीजे.नौकरी करायला पाहीजे. आणि फक्त एकालाच शेतीत उतरवल पाहीजे.आणि सर्वात महत्वाचं शेतीला आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहीजे.त्याच्या उत्पादनाला आपण उद्योगाच्या उत्पादनाचा भाव द्यायला हवा.नाहीतर एक दिवस असा येइल की शेतकर्याला आत्महत्या करावे लागेल…!” डॉ.बाबासाहेबांनी केलेलं भाकीत आज खरं होत आहे.शेतकरी आत्महत्या ही गंभीर समस्या बनली आहे.यासाठी तमाम शेतकर्यांनी आणि सरकारने डॉ.बाबासाहेबांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत त्याचा अंगिकार करणे ही काळाची गरज झाली आहे.”आभाळाला हात लावायचा असेल तर अगोदर स्वतची उंची वाढवली पाहीजे” त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आपण स्विकारले पाहीजेत आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वप्नातला भारत स्वप्नातच राहू न देतो प्रत्यक्षात उतरवला पाहिजे.आजकाल भारतामध्ये धर्माधता वाढत चालली आहे.मुळात भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना असं होत आहे.आणि धर्मांधतावाढवणार्याचच जर शासन असेल तर त्यांना आवरणे खुपच कठिण आहे.आपल्या देशात घटनेमुळेच पक्ष, शासन बनले आहे. पण पक्ष घटना मानतात का? डॉ.बाबासाहेबानी २५ नोव्हेंबर १९४९ ला इशारा दिला होता की “इथले लोक पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील की देशाला? जर ते देशापेक्षा पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचं नष्ट होईल.!”हा भयसुचक संदेशाकडे आपण आज दुर्लक्ष करत चाललो आहोत असं वाटते आणि याविषयी लोकांनी विचार नाही केला तर याचे परिणाम भयंकर होतील.असे म्हणतात की “भुल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभुल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही” हे काही खोटं नाही.भारतामध्ये हे होतांना दिसत आहे.जनतेची निव्वळ दिशाभुल आज सरकार करत आहे ते कोणाचेही असो.कोणत्याही देशामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य खुप महत्वाच आहे. आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य खुपच.पण देशात विद्यार्थ्यांसहीत लोकांना आवाज दाबला जातोय का?लोकांना त्यांचे विचार मांडण्यावर बंधन येत आहेत का?पाठीमागे शासनाने एक परिपञक काढल होत खासदार आमदार,मंञी यांच्यावर टीका टीपन्नी करणारावर गुन्हा दाखल करण्यात येईल .ते पञक पुन्हा वापस घेतल.पण लोकशाही देशात अस पञकच काढायची गरजच का भासते? डॉ.बाबासाहेबांच्या मते ” एखादं शासन टिकण्यापेक्षा लोकांचे अधिकार टिकणे खुप जास्त जरुरीचे असते”. ‘डॉ.बाबासाहेब हा बोलण्याचा विषय नसुन तो आचरणाचा विषय आहे’.म्हणुन त्यांचे विचार आपण स्विकारुन प्रत्यक्ष आचरणात आणले पाहीजेत.आणि कोणताही देश म्हणजे एखाद्या जमिनीचा तुकडा नसुन तर लोकांची एकात्मता आणि माणसाच्या माणुसकीचे अस्तित्व होय.iअमेरिका,रशिया महासत्तेचे आपण उदाहरण देतो. पण स्वतःच महासत्तेचे उदाहरण बनले आहोत का? याचा विचार आपण करायला हवा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या देशातला शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहीजे आहे,त्यांचा विद्यार्थी हा भारतासाठी जगणारा पाहीजे आहे,भारतातले लोक त्यांना विज्ञानवादी पाहीजे आहेत,भारतामध्ये समता स्वातंत्र्य,बंधुत्व,आणि सामाजिक न्याय त्यांना पाहीजे आहे,स्त्रियांचा संन्मान करणारी लोक त्यांना हवीत.त्यांना जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मताह: समान आहेत ,देश त्यांना महासत्ता हवा आहे लोकशाही आज जी ठोकशाही सामान्यांना वाटते ती “लोकांनी चालवण्यापेंक्षा ती लोकांसाठी चालवली जात आहे” असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे. डॉ.बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्याच ” लोकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय जिवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवुन आणणारी शासनव्यवस्था म्हणजे लोकशाही होय”. आहे.म्हणजे लोकांच्या पुर्णत जिवनात परिवर्तनकारी बदल घडवणे हेच बाबासाहेबांच्या लोकशाहीचे ध्येय आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की ” आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यत आपण आपल्या मायभुमिच्या स्वातंत्र्याचे रक्षण करायला हवे”. खरी देशभक्ती राष्ट्रीयत्व काय? “एखाद्या भारतीय व्यक्तीला परदेशात काही झाल्यास ‘संपुर्ण देश’ पेटुन उठला पाहीजे फक्त त्याच्या धर्माचे किंवा जातीचेच लोक नव्हे..!”हेच खर्या एका राष्ट्राचे लक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जाती,पोटजाती,अनेक धर्म,पंथ यांना संविधानाच्या माध्यमातून बांधून ठेवल आहे.”आठशे खिडक्या आणि नवशे दार”म्हणून विन्स्टन चर्चिलने भाकीत केलं होतं की हा देश एकसंध राहूच शकत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांमध्ये एवढी ताकत आहे की त्यांनी या सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवल आहे. आणि विन्स्टन चर्चिल यांचे भाकीत खोट ठरवलं आहे.बाबासाहेबांविषयी जेवढ सांगावं, लिहाव तेवढ कमीच आहे म्हणून शेवटी मी असच म्हणेन” अगर पैदा न होता यह मशिहा तो यह खुशियोंका शिल शीला नही होता. बेरंग रहती ये जमीन और आसमा का रंग निला नही होता.भारत तो कबका कंगाल होता यारो अगर इस देश में भीम जैसा हीरा पैदा न होता.
