
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८७५ वा दिवस जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या हातून चुका होतात. बिनकामाचे, कामचुकार लोक दुसर्यांच्या चुका, दोष शोधण्यातच आपले संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतात. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतःच्या चुकांनी त्यांनी स्वतःवर ही दुर्दशा ओढून घेतलेली आहे. इतरांना दोषी ठरवल्यामुळे त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडणार नाही. त्यांना कसलाही फायदा होणार नाही. उलट दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे बनतात. म्हणून स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कोणालाही दोष लावू नका. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घ्या.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २३ चैत्र शके १९४७*
★ चैत्र वद्य/कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १३ एप्रिल २०२५
★ १६९९ गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हा गुरु पंथ तयार केला.
★ १७३१ इतिहासप्रसिध्द वारणेचा तह होऊन शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे छत्रपती शाहू (सातारा) व छत्रपती संभाजी (कोल्हापूर) असे दोन भाग झाले.
★१९१९ अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. त्यात ३७९ ठार तर, १२०० जखमी झाले होते.
★ १९४८ भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.
★ १९५१ औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा स्मृतीदिन.


