
लासलगाव, ता. ११ ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.प्रभाकर गांगुर्डे, प्रा.रामसिंग वळवी, प्रा.लता तडवी, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रा.से.यो. स्वयंसेवक अविनाश खरात आणि उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कल्याणी ठोके या विद्यार्थिनीने आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
