
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
नेहरु,इंदिरा गांधी यांच्या युग अस्तानंतर पंतप्रधान झालेल्या राजीव गांधी ना एकदाच स्पष्ट बहुमत मिळाले.
मात्र बोफोर्स भ्रष्ट्राचर प्रकरणासह विविध मुद्दयावरुन घेरलेले राजीव गांधी पक्षाला सत्तेत आणु शकले नाही आणि साधारणत;१९८९ सालापासुन भारतात राजकीय स्थेर्य नष्ट होऊन आधाडयाच्यां राजकारणाला प्रारंभ झाला.
सन १९८९ ते सन २०१४ या पंचवीस वर्षाचे कालखंडात विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही.नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी (तीन वेळा) , एच.डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल व मनमोहन सिंग (दोन वेळा) असे सात पंतप्रधान एकुण दहा वेळा सरकार बनवुन सत्तेवर आले.म्हंणजे या अस्थिर काळात दुप्पट संख्येने पंतप्रधान झाले.
याच बदलाबदलीचे काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळणे, रुपयाचे अवमुल्यन,भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली होणे, आर्थिक उदारीकरण, अणुबॉम्ब निर्मिती अशा अनेक बर्या वाईट व दुरगामी परिणाम करणार्या घटनाही झाल्या.
पंचवीस वर्ष सुरु असलेले हे आघाडयाचें राजकारण संपणे, संपवणे अशक्ष आहे व स्पष्ट बहुमतातील सरकार सत्तेत येणे अवघड आहे असे वाटत असतानांच राजकिय क्षितीजावर केंद्रीय राजकारणात नरेंद्र मोदी नावाच्या तळपत्या सुर्याचा उदय झाला आणि सन २०१४ मध्ये स्पष्ट बहुमत मिळवत नरेद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले.
त्यानंतर सन २०१९ मध्ये ही स्पष्ट बहुमत मिळवण्याचा चमत्कार मोदीनीं करुन दाखवला.
सन २०२४ मध्ये निवडणुक रणनिती थोडी चुकली असली तरी स्पष्ट बहुमताच्या जवळपास २४० जागा जिंकत मित्रपक्षासह मोदीच्या आघाडीने मात्र पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवले.
नेहरु व श्रीमती गांधी नंतर हा चमत्कार करणारे नरेद मोदी हे एकमेव नेते आहेत.अर्थात नेहरु व श्रीमती गांधी यांचे कालखंडात विरोधक फारसा प्रबळ वा सक्षम नव्हता.तुलनेत मोदीनीं मात्र सत्तारुढ कॉग्रेस ला सत्तेतुन खाली खेचण्याचा व त्यानंतर आजतागायत सत्तेबाहेर ठेवण्याचा भीम पराक्रम केला आहे.
आजच्या १० जुन रोजी मोदी नीं सलग बारा वर्ष पंतप्रधान पदावर काम करण्याचा विक्रम केला असुन त्यांनी नेहरुचां सर्वाधीक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोडला आहे.याच बरोबर सलग पंचवीस वर्ष सरकारचे प्रमुख म्हणुन राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.आणि हे सगळे करतानां ना त्यांना घराणेशाहीचा वारसा होता, ना पुर्वजाचीं कसली पुण्याई.
मोदीजीचीं राजकिय कारकिर्द सुरु झाली ती गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन सन २००१ साली.
त्यावेळी गुजरात मध्ये प्रचंड गट तट व अंतर्गत बंडाळी माजलेली होती. केशुभाई पटेल, शंकरसिंह वाघेला, सुरेश मेहता आदीचीं सरकारे येऊन गेली होती.वाघेला सारखे मातब्बर नेते भाजप मधुन कॉग्रेस मध्ये गेलेले होते.अशा बिकट अवस्थेत भाजपची सत्ता कशीबशी टिकुन होती.पण जनता निराश झाली होती. कॉग्रेस, जनता दल व भाजप सगळेच एका माळेचे मणी असं मत जनतेचं झालं होतं.
मोदी संघाचे काम पहात होते.नंतर ते राजकारणात आले व तत्कालीन भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनेहर जोशी आदी दिग्गज नेत्याबरोबर त्यांनी काम केले होते.
दिल्लीत दिग्गजाबरोबर काम करत असतानांही त्यांचे गुजरातकडे लक्ष होतेच पण गुजरातचे भाजप नेते मात्र मोदीनां पसंत करत नव्हते आणि म्हणुन मोदीवर दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा येथील पक्ष संघटन मजबुतीचे काम देऊन त्यांना गुजरात पासुन लांब ठेवले जात होते.
पण गुजरात मध्ये भुज, कच्छ भागात भुकंप झाला आणि तत्कालीन सरकार येथील पुनर्वसन कामात अपयशी ठरली.जनता नाराज, विरोधक आक्रमक, पक्षात गटबाजी व निवडणुका तोंडावर अशा कोंडीत भाजप नेते सापडले होते.
आगामी काळात गुजरातची सत्ता हातातुन जाते काय या भीतीतुन शेवटी नेतृत्वबदलाचा निर्णय झाला.आणि इतके दिवस मोदीनां दुर ठेऊ पाहणार्या नेत्यानीं अखेर कठिण समयी मोदीकडेच धुरा सोपवली.
सत्तेचा कुठलाही अनुभव नसतानां थेट मुख्यमंत्री झालेल्या मोदीनां काय सरकार चालवता येणार ? गट बाजी च्या राजकारणात ते किती टिकणार ? आणि टिकले तरी निवडणुक काय जिंकु देणार असं पक्षातील लोकासह विरोधक व जनतेला ही वाटत होतं.
पण हे पाणी वेगळचं होतं.
सत्ता हातात घेतल्यावर नरेद्र मोदी यांनी प्रथम सरकारी खाक्या बदलवला. करु, पाहु, होईल, थांबा अशी मानसिकता असणार्या सरकारी यंत्रणेवर जबाबदारी निश्चित व योग्य परिणाम तथा निकालाची अपेक्षा व्यक्त केली.अपेक्षेस खरे न उतरणार्या बडया बाबुनां एकतर घरी बसवले किंवा कामास जुंपले.स्वत: मोदीही दिवस रात्रीचे चार पाच तास वगळता सतत कार्यमग्न होते व त्यांनी यंत्रणेसही कामाला जुंपले.याच बरोबर पक्ष शिस्त मोडणारे, स्वत;ला मोठे समजणार्या नेत्यानांही वठणीवर आणले आणि सरकार प्रमुख म्हणुन सरकारी यंत्रणा जशी सुतासारखी सरळ केली तशीच पक्ष संघटनाही मजबुत करतानां पक्षापेक्षा स्वत;ला मोठं समजणार्याचीहीं त्यांनी गाठोडी बांधली व बाकी लोक वळणावर आणले.
भुकंप भागात त्यांनी अक्षरश सरकार व यंत्रणा आणुन उभी केली आणि ज्या पुनर्वसन कामाला किमान दहा वर्ष तरी लागतील ते काम धडाक्याने व झपाटयाने करुन दाखवले.जनता हे पहात होती.
हा मुख्यमंत्री लोकामधला होता. स्वत; काम करत होता, इतराकडुन करवुन घेत होता.
आणि राज्याला अशाच नेत्याची गरज होती.जनतेने अशक्य वाटणारी निवडणुक मोदीनां जिंकवुन दिली.
मोदीच्यां राजवटीत गोधराचे प्रकरण घडले.खरेतर अयोध्येवरुन प्रभु श्रीरामचंद्र यांचे दर्शन घेऊन परतणार्या भाविकानां जिवंत जाळण्याचा आसुरी व भयानक प्रकार समाजकंटकानी केल्यानंतर याचे भयकंर पडसाद उमटणारच होते. त्या झालेल्या दंगलीस मोदी तरी काय करणार ? खरे आरोपी तर हिंदु भाविकानां जिवंत जाळणारे समाजकंटक होते.पण या दंगलीचे खापर मोदीवर फोडले गेले.मोदी यास जबाबदार आहे असेच विरोधकाकडुन पसरवले गेले.
गंमत म्हणजे फाळणीच्या वेळी लाखो हिंदु मारले गेले त्याची जबाबदारी कॉग्रेस ची नाही.इंदिरा हत्ये नंतर हजारो शीख मारले गेले त्यास राजीव गांधी सरकार जबाबदार नाही. जम्मु काश्मिर मधुन लाखो हिंदु पळवुन लावले त्याची जबाबदारी तत्कालीन सरकारावर नाही.
देशभरात शेकडो दंगली झाल्या त्याची जबाबदारी त्या त्या सरकार वर नाही.पण एका दुष्कृत्याचे पडसाद उमटुन गुजरात मध्ये दंगल काय झाली तिचे भांडवल आजतागायत हे हिंदु द्वेष्टे ढोंगी लोक करत आहे.
पण जनतेने मात्र या लोकानां सातत्याने पराभुत करत यांची लायकी यांना दाखवुन दिली.शेवटी जनमत हेच महत्त्वाचे.
मोदीनीं विरोधकाच्यां खालच्या पातळीवरील टिकेला कधीच भीक घातली नाही.सतत काम व काम हेच सुत्र ठेवले व इतरानांही कामाला जुंपले आणि त्यामुळे च मोदी गेली पंचवीस वर्ष अपराजित आहे.
गुजरात मध्ये प्रचंड अडचणी सोसुन ज्या पद्धतीने त्यांनी विकास केला तो अभुतपुर्व होता.
मोदी मुख्यमंत्री असतानांच विदेशातील अमेरिका वगैरे सरकारने त्यांना प्रवेश नाकारला.पण मोदीनीं त्याच अमेरिकेला आपल्या पायाशी झुकवत सन्मानाने आमंत्रण दयायला भाग पाडले.
पंतप्रधान पदाच्या कालखंडात पाचशे वर्षापासुन प्रलंबित प्रभु श्रीरामचंद्र जन्मभुमीचा वाद मिटवुन त्यांनी प्रभुचे मंदिर उभारले ही केवढी ऐतहासिक कामगिरी म्हणता येईल.
देश हित प्रथम म्हणत कलम ३७० हटवणे हा अभुतपुर्व धाडसी निर्णय मोदीनीं घेतला.
नोटबंदीचा निर्णय असो कि पाकला घरात घुसुन मारणे. केवढा हा भीम पराक्रम.
कॉग्रेस व इतर आघाडी सरकारचे काळात चीन नावाच्या भुतापुढे सरकार नांगी टाकत असे.पण मोदीनीं प्रथमच चीनच्या नजरेलाही नजर दिली व पन्नास पेक्षा जास्त चिन्यानां यमसदनाला धाडुन चीनला कायमचा धडा शिकवला.
मेक इन इंडियाचा नारा असो वा स्वदेशीचा.चौफेर यशाचे व प्रगतीचे शिखर गाठत मोदीनीं एक चायवाला ते पंतप्रधान ही अभुतपुर्व झेप घेतली व देश ही महासत्ताच्यां रांगेत उभा केला.
मोदीच्यां कार्याचे मुल्यमापन करायचे तर एक पुस्तक अपुरे पडेल.
इतिहास रचणार्या मोदीनां पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
