
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९९ वा दिवस
आपण दुबळे आहोत असे समजणे हे सगळ्यात मोठे पाप होय. तुमच्यापेक्षा मोठा असा कुणीही नाही; तुम्ही स्वरूपतः ब्रह्म आहात ह्याची उपलब्धी करून घ्या ह्या सत्याचा साक्षात्कार करून घ्या. कोणत्याही वस्तूच्या स्धायी तुम्हाला जी शक्ती दिसते ती तुम्हीच तिला दिलेली असते. ज्या वस्तूवर तुम्ही ज्या आणि जेवढ्या शक्तीचा आरोप करता, ती आणि तेवढीच शक्ती तिच्या ठायी असते. आपण सूर्याच्या, चंद्राच्या, ताऱ्यांच्या, नव्हे, ह्या समस्त जगत्प्रपंचाच्या पलीकडे आहोत. मानव हा स्वरूपतः ब्रह्म आहे हे लोकांना शिकवा. वाईट म्हणून काही आहे ह्याचा इन्कार करा; जे नाही, ते नव्याने उत्पन्न करू नका. खडे व्हा आणि म्हणा की, मी मालक आहे, स्वामी आहे, मी सर्वांचा स्वामी आहे. आपल्याला जखडणारी शृंखला आपण स्वतःच घडविली आहे, आणि फक्त आपणच ती तोडू शकतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास २२ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १२ जून २०२६
★ १९०५ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक संघांची स्थापना केली.
★ २००० सुप्रसिध्द मराठी लेखक, अभिनेते, विनोदवीर, महाराष्ट्रचं लाडक व्यक्तीमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. देशपांडे यांचा
★ जागतिक बालकामगार विरोधी दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
