
आमच्या आई कै.सौ.दगूबाई बापूराव उगले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आम्ही साहित्यिक पुरस्कारांचे आयोजन करत आहोत. आयुष्यभर कष्ट उपसत आणि ऊन-पावसाला अंगाखांद्यावर खेळवत आईने आमचा संसार हिरवागार म्हणजे खऱ्या अर्थाने सोन्याचा केला. आईचं हे संस्काराचं हिरवेपण चिरकाल राहो! हाच या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे. आमची आई स्वतः एक उत्तम वाचक होती. म्हणून या पुरस्कारासाठी जमा होणारी ग्रंथसंपदा तिच्याच नावाने दरवर्षी वेगवेगळ्या भागातील ग्रंथालये आणि शाळा यांना विनाशुल्क भेट दिली जाणार आहे.
कविता,कथा,कादंबरी आणि बालसाहित्य या साहित्यकृतींना (दरवर्षी यातील एक साहित्यप्रकार) पुरस्कार दिला जाणार आहे. सन २०२५ या वर्षासाठी ‘काव्य’ (कविता) या साहित्यप्रकाराला हा पुरस्कार दिला जाणार आहे.
तरी यासाठी आपण १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने दिलेल्या मुदतीत खालील पत्त्यावर पाठवावीत.कवी- श्री. राजेंद्र बापूराव उगले ५, पसायदान, समर्थ रो बंगलो शिवसमर्थनगर, RTO जवळ पेठ रोड, नाशिक. पिन- ४२२००४ संपर्क- ९९२२९९४२४३
नियम
१) मान्यवर परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
२) पुरस्काराचे स्वरूप रुपये ३,००० रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र.
३) पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजक यांच्या सोयीने घेतला जाईल.
४) पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यिकांना प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागेल. पुरस्कार पोष्टाने/कुरियरने वगैरे पाठविला जाणार नाही किंवा प्रतिनिधीकडे दिला जाणार नाही.
५) पुरस्कारार्थी यांना कोणत्याही प्रकारचा प्रवासखर्च दिला जाणार नाही. मात्र आवश्यकता वाटल्यास निवासाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली जाईल.
६) पुरस्कार वितरण सप्टेंबर-२०२६ मध्ये केले जाईल. निवड झालेल्या साहित्यिकाला यथावकाश तारीख आणि इतर तपशील कळवला जाईल.
७) याबाबतचे सर्व अंतिम निर्णय संयोजकांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत.
८) मुदतीनंतर प्राप्त झालेले साहित्य ग्राह्य धरले जाणार नाही.
९) सदर पुस्तके आपण शाळा किंवा ग्रंथालये यांना विनाशुल्क देणार असल्याने पुरस्कारासाठी पाठविलेल्या पुस्तकावर कोणताही मजकूर लिहू नये. आपला अल्पपरिचय, पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवत असल्याचे पत्र आणि पासपोर्ट फोटो स्वतंत्रपणे त्याच पाकिटात पाठविण्यात यावा.
