
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर यांजकडुन
इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात रोजगाराचे शोधात असणार्या युवक युवतीसाठी रोजगार मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक तथा समता परिषदेचे तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शिवा काळे यांनी दिली आहे.
उदया बुध. दि. १० जुन रोजी घोटी शहरातील रामराव नगरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
– रोजगार मिळवणेसाठी इच्छुक युवक युवतीनीं यावेळी योग्य कागदपत्रासह हजर रहावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.
