
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९४ वा दिवस
विद्या व अविद्या, किंवा ज्ञान व अज्ञान ही दोन्ही आहेत, हे जग या दोहोंचे आहे. परंतु आत्म्यावर अविद्येचा कधीच परिणाम होत नसतो, तो अविद्येने कधीच झाकला जात नसतो, कधीच अविद्याच्छन्न होत नसतो. सापेक्ष ज्ञानही चांगले, कारण ते त्या चरम, निरपेक्ष ज्ञानाप्रत आरोहण करण्याची पायरी होय. परंतु, इंद्रियांनी होणारे ज्ञान म्हणा, की मनाने होणारे ज्ञान म्हणा, की वेदांनी होणारे ज्ञान म्हणा, हे कोणतेही ज्ञान परमार्थतः सत्य असू शकत नाही, कारण ही सारी ज्ञाने सापेक्ष ज्ञानाच्या कक्षेमधेच आहेत. 'मी देह आहे' हा भ्रम आधी दूर करून टाका, मगच खऱ्या ज्ञानाची स्पृहा जन्मेल. मानवी ज्ञान हे पाशव ज्ञानाचीच केवळ एक उच्च अवस्था होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास १७ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ७ जून २०२६
★ २००२ भारताचे माजी उपराष्ट्रपती बासप्पा दानाप्पा ऊर्फ बी. डी. जत्ती यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक अन्न सुरक्षा दिन.
