
स्वराज्य संकल्पक शहाजी राजानीं स्वराज्याचे स्वप्न .
छत्रपती शिवाजी महाराजानीं या स्वप्नाची पुर्ती केली. मुसलमानी परकिय सत्ताच्यां छाताडावर पाय रोवुन स्वराज्य उभारले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजानीं या स्वराज्यासाठी अभुतपुर्व बलिदान दिले.
महाराणी येसुबाई नी स्वराज्यासाठी त्याग केला.कैद पत्करली.
छत्रपती राजाराम महाराजानीं शुर सेनापती संताजी व धनाजी सोबतीने स्वराज्य शर्थीने राखले.
कठिण कालखंडात महाराणी ताराबाई नीं हाती तलवार घेऊन मुसलमानी शाहीचा खातमा केला.छत्रपती शिवाजी महाराज ते महाराणी ताराबाई हयांचा व औरंगचा दोन पिढयाचां रक्तरंजित संघर्ष एकदाचा संपला.
मराठयाच्या जिद्द व चिकाटी पणापुढे , गनिमी काव्यापुढे बलाढय दैत्य औरंगचा अंत झाला.
औरंग आक्रमणाने विस्कटलेले स्वराज्याची पुनर्चना केली छत्रपती शाहु महाराज यांनी.
त्यांना मोलाची साथ केली पेशवा बाळाजी बल्लाळानीं.पेशव्यानीं दिल्लीच्या तख्ताला मारुन धडक, मुसलमानी बादशहाला आणिले शरण, घरावया लाविले चरण.
श्रीमंत बाजीराव बाळाजी बल्लाळ पेशव्यानीं स्वराज्याचा पसरवला दरारा, माणुस कसला, बाजीराव तर भिरभिरणारा वारा, न जात पाहिली न पाहिली पात, उदयास आणिले वीर एक साथ.
मल्हारबा होळकर, राणोजी शिंदे, गायकवाड, पवार असे कितीतरी रत्ने पारखली,उदयास आणली,सरदारकी केली बहाल.दिला पराक्रमास वाव.
समस्तानीं गाजवली उत्तर दिशा, मराठी साम्राज्याला दिला आकार,उभ्या हिंदोस्थानात गाजली मराठा तलवार.
यात अग्रणी मल्हारबा, माळवा सुभ्याचा घेऊन ताबा, हादरवला राजपुताना, कायम केले मराठा साम्राज्या.
मल्हारबाची सुन अहिल्या होती हुशार, सासर्याच्या माघारी सांभाळी राज्याचा भार,दिन दुबळयाचा दु;खाचा हलका करी भार, प्रसंगी घेऊन हाती तलवार,केला धुरंदर राज्यकारभार.
आयुष्यात प्रसंग आले किती यातनामय, मातोश्री गौतमीबाई गेल्या कणखर.पती खंडेरावाचेंही बलिदान लढाईत. पित्यासमान मल्हारबा गाजवुन किर्त,जाहले इतिहासात अमर.
अहिल्यापुत्र मालेराव ही झाले अल्पवयातच स्वर्गस्थ, उरल्या एकाकी मातोश्री अहिल्याबाई होळकर.
पण न त्या डगमगल्या, न झुकल्या,शर्थीने लढल्या,राहिल्या अतुट खंबीर.
रघुनाथ पेशवाची पडली माळवा सुभ्यावर वक्र नजर, मुढमती, अल्पबुद्धी, कुलनाशक रघुनाथ राव आला चालोन.
बाईने हे पाहुन, पुकारला यल्गार. दिला रावास जबाब, अरे मुढा, मी अबला नारी,हरले जरी, तरी न होय पराक्रमाचे तुझ्या कौतुक.लोक म्हणतील, यात काय एवढे ? हरवले एका नार अबलेस ?
पण ए मुढा, विचार कर जरा.जर मी हरवलेस तुला.तर फिरशील कसा ? जगात दाखवशील कसा ? घेऊन पराभवाचे डाग.जन बोलतील, एका अबलेने हरविले यांस, पहा, पहा, हा मुढ , म्हणे याने झेंडे रोविले अटकेपार.
शब्दवाणीने चरकला,दचकला राव, घेतली तशीच माघार, या पराक्रमी होत्या अहिल्या बाई होळकर.
ज्यांनी केले अति काम, गोर गरिबासाठी उभारले घाट, बांधले नदी, नाले, उभारली पथिकगृहे.
जिर्णोध्दार केला अनेकानेक देवालयाचां , नाश मुसलमानी हरामीनीं केला होता जयाचा.
राखिला सुभा, राहुन पेशवा माधवरावाचे मर्जीत. वाढविला विस्तारला, माळव्याचा सुभा समृद्ध.
तुकोजी होळकरास देऊन सेनापतीची वस्र, शिंदे व होळकर बनले मराठा राज्याचे आधारस्तंभ.
दान, धर्म बहु केला. केला गो ब्राम्हणाचा सन्मान.धर्माची फडकवली उंच ध्वजा, दिंगत किर्ती, मराठा साम्राज्या.
देव केले मुक्त, केला जीर्णोद्धार,धर्म कार्यास लावला हातभार,दिला केवढा आधार.
हा देह झिजवला देव, देश अन धर्मासाठी,ही महान माता,पुण्यात्मा,प्रेरक सर्वासाठी.
करु वंदन,धरु या चरण, या मातोश्री चे, जिचे अनंत उपकार जनावर, न कधी फिटायचे.
🙏
लेखक
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
