
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८८ वा दिवस
तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत. आता हे रुदन थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि ’पुरुष’ व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवा आहे. आपल्याला मनुष्यनिर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्यनिर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथेच सत्याची पारख होणार आहे. जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करते, बौद्धिक दास्यात टाकते आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटते त्याला विषसमान मानून अव्हेरा. त्यात काही जीव नाही. ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवते तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. देदीप्यमान, सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्त्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणार्या सर्व गोष्टींपासून दूर राहा. वेगळे व्हा. उपनिषदातली सत्ये आपल्या समोर आहेत. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्यासह जगायला शिका. भारतभूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ११ शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. १ जून २०२६
★ १९२९ कोल्हापूर येथे “प्रभात” चित्रपट कंपनीची स्थापना.
★ १९४५ भारतीय विज्ञान संशोधन संस्थेच्या परिसरात टाटा मुलभूत संशोधन संस्थेची स्थापना.
★ १९९८ अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत व लेखक, कुशल छायाचित्रकार गोपाळ नीळकंठ तथा गो. नी.दांडेकर यांचा स्मृतीदिन
★ जागतिक दुध दिन…
