
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८६ वा दिवस
जेव्हा आपल्या ठिकाणी अहंबोध असत नाही, आपल्या मनात जेव्हा स्वतःचा विचार असत नाही तेव्हाच आपण चांगले काम करू शकतो, इतरांवर आपला प्रभाव जास्तीत जास्त पडू शकतो. सर्वच थोर थोर प्रतिभाशाली लोक हे जाणून असतात. तो प्रभूच खरोखर एकमेव कर्ता त्याच्या समोर स्वतःला उघडून द्या, स्वतःच काहीही करू नका. श्रीकृष्णांनी गीतेत म्हटले आहे *"न मे पार्थाऽस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन"* 'अर्जुना, तिन्ही लोकांत मला कर्तव्य म्हणून काहीच नाही.' त्याला मनापासून शरण जा, त्यांच्यावर सारा हवाला ठेवा, संपूर्णपणे अनासक्त व्हा, तरच तुमच्या हातून काही खरेखरे काम होऊ शकेल. ज्या साऱ्या शक्तींनी खरोखर काम होत असते त्या तर आपण पाहू शकत नाही, आपल्याला त्यांचे फक्त फळ दिसू शकते, इतकेच. 'मी'ला दूर सारा, त्याचा नाश करून टाका, बस् तुमच्यामधून ईश्वराला काम करू द्या. आपण जितके मी ला बाजूला सारू तितकाच ईश्वर आपल्या आत येईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ९ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. ३० मे २०२६
★ १८९४ इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्मदिन
★ १९१६ अत्यंत लोकप्रिय, प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्मदिन
★ १९३४ मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
★ १९५० प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचा स्मृतीदिन.
★ गोवा मुक्ती दिन
★ राष्ट्रीय सर्जनशीलता दिवस.
