लेखक
शंकर नामदेव गच्चे नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

महात्मा जोतीराव फुले यांनी बहुजन समाजासाठी कोणते कार्य केले?हे कार्य करताना त्यांना कोणकोणत्या संकटाना,समस्यांना तोंड द्यावे लागले.त्याकरीता त्यांना कीती कष्ट घ्यावे लागले,कीती यातना भोगाव्या लागल्या आणि ऐवढ्यातूनही त्यांनी आपले कार्य शेवटच्या श्वासापर्यंत कसे यशस्वी रित्या पार पाडले याचा आढावा घेताना त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही सुध्दा कार्यप्रवण झाले पाहिजे.राष्ट्रपिता जोतीराव फूले यांचा जन्म ११-एप्रिल-१८२७ रोजी एका साधारण माळी कुंटुबात झाला.सातारा जिल्ह्यातील ‘कटगुण’ हे त्याचे मूळ गाव.त्यांचे मुळचे आडनाव गोर्हे परंतु ते फुलांचा व्यवसाय करीत असल्याने त्यांची ओळख फुले म्हणून होऊ लागली.जोतीरावांच्या वडीलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई,आईच्या निधनानंतर सगुणाबाई क्षिरसागर या विधवा मावसबहीणीने जोतीरावांचा सांभाळ केला. त्याकाळी शिक्षण ही केवळ ब्राम्हणांची मक्तेदारी असल्याने त्यांची मुले ब्राम्हण पंडितांच्या घरी शिकत असत.१८२४ साली मिशनर्यांनी पुण्यात मराठी शाळा सुरु केल्या होत्या अशाच एका मराठी शाळेत जोतीराव यांना त्यांच्या वडीलांनी दाखल केले.जोतीराव अभ्यासात तरबेज आहेत हे पाहून कपटी ब्राम्हणांनी धर्मशास्ञांचा हवाला देत गोविंदरावांचे कान भरले व जोतीरावांचे शिक्षण बंद पाडले.हे पाहून गफ्फार बेग मुन्सी व मिशनरी लिजीट साहेब यांना खुप वाईट वाटले.त्यांनी गोविंदरावांना शिक्षणाचे महत्त्व समजावले व जोतीराव फुलेंना पुन्हा स्काॕटिश मिशनरी शाळेत प्रवेश मिळवून दिला.यातून हे दिसुन येते की,एका मुसलमाने व मिशनरी शिक्षकाने जोतीरावांचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न केला तर एका ब्राम्हणाने जोतीरावांचे भविष्य बिघडविण्याचा प्रयत्न केला. सन १८४० च्या दरम्यान वयाच्या १३व्या वर्षी जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील नायगावचे नेवसे पाटील यांची सुकन्या सावित्रीबाई हिच्याशी झाला.सावित्रीबाई विवाहसमयी अवघ्या ८ वर्षाच्या होत्या.१८४१ मध्ये जोतीराव फुलेंनी पुन्हा स्काॕटिश मिशनरी शाळेत प्रवेश मिळविला व इंग्रजी शाळेतील शिक्षण पूर्ण केले.त्याच दरम्यान अनेक मौलिक ग्रंथ आणि पुस्तके त्यांच्या वाचनात आली व त्यातून त्यांच्या मनामध्ये लोककल्याणकारी भावना निर्माण झाली.पेशवाई नष्ट झाल्याने ब्राम्हण वर्ग दुःखी झालेला होता त्यांच्या मनात इंग्रजांविरुध्द बंडाची भावना उफाळत होती.जोतीरावांचे अनेक मिञ ब्राम्हण असल्याने साहजिकच त्यांच्याही मनाची भावना तशीच होऊ पाहत होती.परंतु थाॕमस पेन या विचारवंताचा “मानवाचे अधिकार”rights of man हा ग्रंथ जोतीराव फुलेंच्या वाचनात आला व त्यामुळे त्यांचे विचार बदलले.इंग्रजांच्या विरोधामागील ब्राम्हणांचा स्वार्थी उद्देश त्यांच्या ध्यानी आला.त्याच दरम्यान जोतीराव फुले यांच्या जीवनास कलाटणी देणारी एक घटना घडली.आपल्या ब्राम्हण मिञाच्या लग्नाच्या वरातीत ते सहभागी झाले असता सनातनी भटांनी त्यांना अक्षरशः धक्के मारून वरातीतून बाहेर काढले.जोतीरावांनी याचे कारण वडिलांना विचारले असता ते जोतीरावांवर रागावले आणि म्हणाले तू कशाला गेला होतास?उपकार मान आज पेशवाई नाही, नाही तर हात्तीच्या पायाखाली दिल असत तुला.म्हणून म्हणावस वाटत,”जोतीराव तुम्हाला वरातीतून हाकलून दिलचं नसतं तर बहुजनंच्या उध्दाराचं हे चक्र फिरलच नसत.”परिणामतः जोतीराव फुलेंच्या मनात ब्राम्हणवादा विरूद्ध सामाजिक विद्रोहाची ज्योत पेटली.ब्राम्हणांकडून झालेल्या अपमानास्पद व्यवहाराने ते उद्विग्न झाले व विचार करू लागले की,हे ब्राम्हण आमच्याशी असे का वागतात.आम्हाला हीन वागणूक का देतात ?विचारांती ते या निष्कर्षाप्रती आले की,सामाजिक जीवनात ब्राम्हण हा श्रेष्ठ असल्याने शुद्रादिशुद्र त्यांच्या वर्चस्वाच्या अधिपत्याखाली शतकानुशतके गुलामगिरीचे जीवन जगत आहेत.गुलामगिरीचे हे हिडीस स्वरूप पाहून त्यांच्या मनात चेतना निर्माण झाली.त्यांनी हिंदूधर्माचा सखोल अभ्यास सुरू केला.त्याच बरोबर बुध्दचरिञ,मार्टिन ल्युथर व प्रो.विल्सन आदि विचारवंतांचे हिंदू धर्म शास्ञांविषयीचे विचार तसेच संत साहीत्यही अभ्यासले.त्यातुन त्यांच्या लक्ष्यात आले की,शूद्रादिशुद्रांची दयनी अवस्था त्यांचा अज्ञानामुळे झाली आहे.त्यांना ज्ञानाचा प्रकाश मिळाल्याशिवाय त्यांचे उत्थान होऊ शकणार नाही.परिणामतः त्यांनी शुद्रादिशुद्रांना शिक्षित करण्याचा संकल्प केला.ज्ञानाच महत्त्व पटवताना ते म्हणतात,”विद्येविना मती गेली.मतिविना निती गेली
निती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले
ऐवढे सारे अनर्थ
एका अविद्देने केले,जोती म्हणे” भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून आपला संकल्प कृतीत उतरवला.१- जानेवारी -१८४८ जोतीराव फुले सारख्या शुद्राने शुद्रादिशुद्रांसाठी शिक्षण अभियान सुरू केल्याचे पाहून पुण्यातील सनातनी ब्राम्हणांचे पित्त खवळले व त्यांनी सर्वत्र हल्लकल्लोळ माजविला की,जोतीरावाने धर्मशास्ञांचा अवमान करून शुद्रादिशुद्रांना शिकविण्याचा जो घाट घातला आहे त्यांनी तो ताबडतोब थांबवावा.परंतु भटांच्या या धमक्यांना जोतीरावाने भिक घातली नाही.आपल्या पत्नीलाही शिकवून या कार्यात उतरवले.त्यामुळे धर्म बुडाल्याची थाप मारून भटानी गोविंदरावांना धमकावले,समाजातुन बहीष्कृत करण्याची धम्मकी दिली.शेवटी जोतीराव व सावित्रीला गोविंदरावांनी हाकलून दिले.उस्मान शेख नावाच्या जोतीरावांचा मिञाने त्यांना आपल्या घरी आसरा दिला.यातून हेच सिध्द होते की,महापुरूष जेव्हा एखाद्या उद्दिष्ट प्राप्तीचा ध्यास घेतात तेव्हा ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी कोणत्याही संकटाची पर्वा न करता जीवाची बाजी लावतात.जोतीराव फुले यांचे स्ञी शिक्षण क्षेत्रातील अलोकिक कार्य पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला .त्यांच्या सन्मानप्रित्यर्थ पुणे येथे विश्रामबाग वाड्यात समारंभाचे आयोजन केले.१६- नोव्हेंबर – १८५२ त्या समारंभाचे अध्यक्षपद पूना संस्कृत काॕलेजचे प्राचार्य मेजर केंडी यांनी भुषवले होते. सत्कार समारंभात जोतीराव फुलेंना २०० रुपयाची शाल भेट म्हणून देण्यात आली.व पुष्पमाला अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.पुण्यातील भटाना माञ हे पाहवले नाही.पेशव्यांच्या राजधानीत एका शुद्राचा सार्वजनिक सत्कार व तोही शाल देऊन हे त्यांना अजिबात रुचले नाही.कारण पेशवाईत केवळ ब्राम्हण पंडितांचाच शाल देऊन सत्कार केला जात असे.जोतीराव फुले यांच्या निरंतर प्रबोधनामुळे शुद्रादिशुद्रामध्ये जागृती होत राहिल्याने त्यांचा भटांच्या पोथीपुराणावरील विश्वास कमी होऊ लागला.त्यामुळे ब्राम्हण वर्ग चिंताग्रस्त झाला व त्यांनी शुद्रादिशुद्रांना आपल्या जाळ्यात पुन्हा अडकविण्यासाठी सत्यनारायणादि मनगंढत कथा रचल्या व त्यांची लुटमार सुरू केली.हे पाहून जोतीरावांनी ब्राम्हणांच्या अशा कृत्यावर कठोर प्रहार करण्यास सुरूवात केली.त्यांनी “तृतीयरत्न नाटक लिहून ब्राम्हणांचे बींग फोडले.व बहुजनास सावध केले.जोतीराव फुले यांच्या अशा सततच्या भडीमारामुळे ब्राम्हणवर्ग पुरता बिथरला आणि त्यांनी शेवटी जोतीराव फुले यांची हत्या घडविण्याचा कट रचला १८५६ त्यासाठी त्यांनी धोंडीबा कुंभार व रोड्या रामोशी यांना सुपारी दिली.परंतु ब्राम्हणांचा हा प्रयत्न सपशेल फसला व ते तोंडघशी पडले.जोतीराव व सावित्रीबाईचे शुद्रादिशुद्राप्रती असलेले खरे प्रेम मारेकर्यांच्या दृष्टीस पडले.व ते जोतीरावांना शरण आले.एवढेच नव्हे तर पुढे ते सावित्रीचे अंगरक्षक झाले.धोंडीबा कुंभार याने तर “वेदाचार”नावाचे पुस्तक लिहून चमत्कार घडविला.राष्ट्रपिता जोतीराव फुले शिक्षणास समाज परिवर्तनाचे प्रभावी हत्यार समजत.शिक्षणामुळे पीडित व प्रताडित बहुजन समाज आपल्या हक्क व अधिकाराची लढाई लढण्यास सज्ज होईल अशी त्यांची खाञी होती. मुक्ता साळवे नावाच्या मांतग बालिकेने ब्राम्हणवादी व्यवस्थेवर प्रहार करणारा तेजस्वी निंबध लिहून हे सिध्द करुन दाखवले.छञपति शिवाजी महाराजांची गोब्राम्हण प्रतिपालक ही बीरूदावली जोतीरावांनी खोडून काढून बहुजन प्रतिपालक ही बीरुदावली लाऊन त्यांच्यावर १००० ओळींचा पहीला पोवाडा रचला. व त्यांची पहिली शिवजयंती साजरी केली.हे करण्यामागे त्यांचा एक माञ हेतू होता की,बहुजन समाजाला आपल्या राजाची व इतिहासाची ओळख व्हावी.पण आजही शिवजयंतीचे श्रेय टिळकांना दिले जाते.ज्यावेळी १८८२ ला टिळक व आगरकर यांना इंग्रजांनी मुंबईतील भायखळ्याजवळील डोंगरीच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवले होते.तेव्हा संपूर्ण देशातून त्यांची जमानत घ्यायला कोणी तयार नव्हते,प्रत्येकाला इंग्रजांची भिती वाटत होती तेव्हा महात्मा फुले यांनी आपल्या सत्यशोनक समाजाचे खजिनदार बाबुशेट रामशेट उरवणे यांना सांगून त्यांची त्याकाळात १०,००० रुपये भरुन जमानत घेतली.त्यांना पूण्याला आणुन पुण्याच्या हिराबागेत त्यांचा भव्य सत्कार केला.कामगार चळवळेचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या हस्ते त्यांना मानपञ दिली.व महात्मा फुले बोलण्यासाठी उभे राहीले आणि म्हणाले,”तुम्ही उद्या देशाचे नेते व्हाल! पण एकच करा ब्राम्हण जातीला सोबत घेऊन चालायच अस करु नका.सर्व भारतीयांना सोबत घेऊन चला.तुम्ही देशाचे नेते व्हाल!”पण आगरकरांच्या संपूर्ण साहीत्यात महात्मा फुलेंचा केवळ दोन वेळाच उल्लेख आहे.एक रामशेट बाबुशेट उरवणे हे गुंडप्रवृतीचे होते व फुल्यांमुळे ते सुधारले.दुसरा उल्लेख रेव्हरंड फुले म्हणजे बाटलेले, ख्रिस्ती झालेले.तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर टिळक म्हणतात,”महात्मा फुले नावाची दुर्गंधी पुण्यातून कायमची नाहीशी झाली.”महात्मा जोतीराव फुले व महादेव गोविंद रानडे हे एकमेकांचे मिञ होते.रानडेची पत्नी मरण पावली होती.व बहीणीचा पती मरण पावला होता.महात्मा फुले रानडेना म्हणाले तुम्हाला समाज सुधारणा करण्याची आयती संधी चालुन आलेली आहे.तुम्ही पूनर्विवाह करा.व आपल्या बहीणीचाही पुनर्विवाह करुन द्या. रानडेनी बहीणीचा पुनर्विवाह करुन दिला नाही .पण रानडेनी वयाच्या ३२ व्या वर्षी ११ वर्षाच्या बालिकेबरोबर पुनर्विवाह केला.हे आहेत इतिहासातील न्यायमूर्ती रानडे.विष्णूशास्ञी चिपळूनकरांनी मराठी भाषेचे शिवाजी ही उपाधी आपल्या पुतन्याला लिहीलेल्या पञात लावून घेतली. त्यांनी जोतीरावांना ऊपदेश केला की,जोतीरावांनी धर्म,दर्शनशास्ञ व इतिहास या विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपली भाषा सुधरावी.त्याच प्रमाणे सत्यशोधक समाज व जोतीराव फुले यांच्यावर टिप्पणी करताना विष्णूशास्ञी चिपळूनकर म्हणतात, “भांबूर्डा (आताचे शिवाजीनगर) ते हडपसर या पलिकडे जोतीरावांना कोणी ओळखत नाही.आज वास्तवात काय दिसते ? जोतीराव फुलेंची ख्याती देशभरातच नव्हे तर जगभरात पसरली आहे. (वरील तीनही प्रसंगाचा संदर्भ पुरोगामी ब्राह्मण व प्रतिगामी ब्राह्मण एकाच शरीराच्या दोन बाजू लेखक – प्रा. हरी नरके) जोतीराव फुले यांच्या लग्नाला १२-१३वर्षाचा काळ उलटून गेलेला असतो तेव्हा जोतीरावांच्या नातेवाईक,मिञ ,शेजारी यांच्यात एक चर्चा सुरू झाली की साविञीला काही आता मुलबाळ होत नाही.तेव्हा आता जोतीरावांच दुसर लग्न कराव हा विचार सुरू झाला तेव्हा सावित्रीला सांगण्यात आल तुमचा आता वंश बुडणार आहे.म्हणून एक दिवस सावित्रीबाई महात्मा जोतीरावांना म्हणतात,”स्वामी” सावित्रीबाई जोतीरावांना स्वामी म्हणायच्या तर लोक त्यांना तात्यासाहेब म्हणायचे “आपल्याला काही आता मुल बाळ होत नाही,मला काही आता मुल होत नाही ,आपला वंश बुडून जाईल” तेव्हा जोतीराव सावित्रीला म्हणतात,” मग तुझ म्हणनं काय आहे?” सावित्रीबाई जोतीरावांना म्हणतात,”तुम्ही एक काम कराव अस मला वाटत,तुमच दुसर लग्न कराव”, तेव्हा जोतीराव सावित्रीला म्हणतात “सावित्री कदाचित तो दोष माझ्यात असेल तुझ्यातच असेल ?अस कशावरून आणि मग तुला जर दुसरा सवता करून दिला तर नाही का चालनार .या गोष्टीला आता १६७वर्ष झाले. ऐवढी समता,ऐवढी मनाची व्यापकता,मनाच औदार्य,स्ञीयांना सन्मान देण्याची वृत्ती यामुळेच बाबासाहेबानी जोतीरावांचा आपले दुसरे गूरू मानले. जोतीरावांना नेहमी वाटायचं की बहुजन समाज शिकला तर काय वाचणार त्यासाठी त्यांनी साहीत्य निर्माण केल,छञपति शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहीला पोवाडाकार होते जोतीबा,तृतीयरत्न नाटक लिहील नाटककार होते जोतीबा,शेतकर्याचा आसुड,गुलामगिरी ही शेतकऱ्यांसाठी पुस्तक लिहीली शेतकऱ्यांचे कैवारी होते जोतीबा.
अर्धांगवायुने शरीराची उजवी बाजू निकामी झाली तरी समाजाची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती डाव्या हाताने त्यांनी “सार्वजनिक सत्यधर्म”नावाचे पुस्तक लिहीले.ते पुस्तक प्रकाशित करण्याची त्यांची फार इच्छा होती पण पैशा अभावी ते शक्य नव्हते.ज्या महात्मा फुलेंच मासिक उत्पन्न १२लाख होते.तेव्हा टाटाचे मासिक उत्पन्न २०,००० रुपये होते.भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही समाजाच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा होम केल्यामुळे शेवटी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सुध्दा पैसे राहिले नाहीत.त्यांचे बालमिञ मोरो विठ्ठल वाळवेकर व डाॕ.विश्राम रामजी बोले यांनी हे पुस्तक छापणार म्हणून सांगितल्यावर त्यांना समाधान वाटले व २८- नोव्हेंबर – १८९० रोजी राञी २-२० मिनिटानी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.आयुष्यभर त्यांना सनातनी लोकांनी ञास दिला तर शेवटी अग्नी संस्कार देताना जातीचे लोक आडवे आले यशवंताला ते अग्नी देऊ देत नव्हते.तस तर यशवंत ब्राम्हण महीलेच्या पोटी जन्मलेला पण या देशात आमची बुद्धी जातीच्या अंहकाराने गंजत पडली आहे.शेवटी सावित्रीबाईने त्यांच्या प्रेताला अग्नी दिला आणि एक महान आत्मा अनंतात विलीन झाला.अशा या महान क्रांतिकारकास त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
