
सिन्नर, दिनांक २२,(प्रतिनिधी): सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सिन्नर नगरपालिकेने ५० कोटी लिटर क्षमतेच्या पाणी साठवणूक टाकीची उभारणी करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका आशा करपे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. वारंवार लाईट बंद होऊन,कधी पाईपलाईन खराब होऊन २-२ किंवा ४-४ दिवस पाणी पुरवठा होत नाही. शहराला कडवा धरणातून व दारणा धरणातून वीज पंपाच्या सहाय्याने पाणीपुरवठा टाकीत करून तो पाईपलाईन द्वारे जनतेला नगरपालिका पाणी देत आहे. वेळोवेळी कडवा पाईपलाईन लिकेज होऊन अथवा पुरेसा विजेचा पुरवठा न झाल्यास किंवा वीज खंडित झाल्यास जनतेला ४-४ दिवस पाणी पुरवठा नगरपरिषदेला करता येत नाही यामुळे शहरातील जनतेच्या रोषाला व समस्येला नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व लोकनियुक्त प्रतिनिधींना सामोरे जावे लागते. ज्या वेळी पूर्ण क्षमतेने लाईट असेल व कोणतीही पाईपलाईन लिकेज नसेल किमान ४ दिवस दारणेचा पंप व कडव्याचा पंप जरी बंद असला तरी साठविलेल्या पाण्याच्या टाकीतून जनतेला पाणी पुरवठा करता येईल. तरी अशाप्रकारे टाकीची साठवणूक क्षमता किमान ५० कोटी लिटर क्षमतेची साठवण क्षमता क्षमतेची टाकी भविष्याच्या दृष्टिने बांधण्यात यावी अशी मागणी करपे यांनी केली आहे.
