
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७७ वा दिवस
प्रत्येक सुखानंतर दुःख येते. आत्मा जितका उन्नत तितकी त्याच्या जीवनात ही सुख-दुःखे एका मागून एक लवकर येत असतात. ही सुख-दुःखांची श्रृंखला, पाठशिवणी, हा चढ-उतार हा अंधार उजेडाचा लपंडाव त्याच्या जीवनात खूप झपाट्याने चाललेला आढळतो. पण आपल्याला सुखही नको आहे आणि दुःखही नको आहे. आपल्याला सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडील अवस्था गाठायची आहे. सुखदुःखातीत व्हावयचे आहे. कारण ही दोन्ही आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडतात; त्या दोन्ही आहेत श्रृंखलाच एक सोन्याची आणि दुसरी लोखंडाची इतकेच. या दोघांच्या पलीकडे आहे आत्मा त्याला सुखही नाही किंवा दुःखही नाही सुख आणि दुःख या दोन्ही विशिष्ट अवस्था आहेत आणि अवस्था म्हटली की ती नेहमी बदलणारच. परंतु आत्म्याचे स्वरूप हे कधीही न बदलणारा आनंदी आणि निशांत असे आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास ३१ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २१ मे २०२६ ★ गुरुपुष्यामृतयोग
★ १९९१ भारतात माहीती तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवणारे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेराम्बदुर येथे हत्या. स्मृतीदिन
★ जागतिक दहशतवाद विरोधी दिन…
