
ओझर: (वार्ताहर);नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील बोरस्ते विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी बाजी मारली. इ.५ वी स्कॉलरशिप परीक्षेतपात्र विद्यार्थी कदम ईश्वरी प्रशांत ५ब -६०%, वावधाने साई गोविंद ५ब ४४%, मोकळं श्रीरंग शैलेश ५ई ४९.३३%, नऱ्हे तन्वी विशाल ५ड ४५.३३% गुण संपादन करून यश प्राप्त केले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापक सतीश केदार, पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षिका मंगल सावंत, मेघा शेजवळ, मनीषा मोगल, अनिता शिरोळे यांचे अभिनंदन केले आहे.
