
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७६ वा दिवस
अनंत जगत्प्रपंचाचे कितीही भाग केले तरी तो अनंतच राहील आणि त्याचा प्रत्येक भाग देखील अनंतच राहील. परिणामी आणि अपरिणामी, परिवर्तनशील आणि अपरिवर्तनशील, व्यक्त आणि अव्यक्त या उभय अवस्थांमध्ये ब्रह्म सारखेच विद्यमान असते, किंबहुना एकच असते. त्यात फरक होत नाही. ज्ञाता आणि ज्ञेय एक आहेत हे जाणून घ्या. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी जगत्प्रपंचाच्या रूपाने प्रकट होत आहे. योग्याला ध्यानात ज्या ईश्वराचे दर्शन होते ईश्वराला ज्ञानी स्वतःच्या आत्म्याच्या शक्तीने बघत असतो. आपण ज्याला स्वभाव वा अदृश्य वा दैवी म्हणतो ती केवळ ईश्वराची इच्छाच होय. जोवर माणूस भोगाच्या मागे लागलेला आहे तोवर तो बंधन बंधनात राहणारच. जोवर अपूर्णता आहे तोवर भोग शक्य आहे, कारण भोग म्हणजेच अपूर्ण वासनांची तृप्ती. जीवात्मा प्रकृतीचा उपभोग घेत असतो प्रकृती जीवात्मा आणि ईश्वर या तिन्हींमधील अंतःस्थ सत्य त्या तिन्हींची आधारभूत सत्ता आहे ब्रह्म; परंतु आपण जोपर्यंत ब्रह्म प्रकट करीत नाहीत तोपर्यंत ते आपल्याला दिसत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास ३० शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २० मे २०२६
★ १७६६ इंदूर राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचा स्मृतीदिन
★ १८५० आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार. केसरीचे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्मदिन
★ १९३२ लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक हवामान विज्ञान दिन.
