
नाशिक (जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन) यंदा आधिक मासामुळे श्रीक्षेत्र पंढरपुरी पांडुरंगाचे भेटीस पायी निघणार्या विविध संत महात्मे यांच्या पालख्या व भाविकाच्यां दिंडया यंदा जुलै महिन्यात निघणार असुन भर पावसाळयात यंदाचा पायी दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. यंदा आधिक मास असल्याने पायी दिंडी व पालखी सोहळयाचें प्रस्थान किमान महिनाभर उशिराने व भर पावसाळयात होणार आहे. आषाढी वारीचे निमित्ताने पांडुरंगाचे भेटीसाठी भाविक महिना महिना पायी चालत, टाळ मृदुंगाचा गजर करत व नामस्मरण करत चालत वारी करत असतात. सुमारे चारशे व त्याहुन ही आधिक ही पायी वारीची परंपरा आहे. महाराष्ट्रातुन श्रीक्षेत्र आळंदी येथुन माऊली, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथुन संत निवृत्तीनाथ, पैठण येथुन संत एकनाथ बाबा, श्रीक्षेत्र देहु येथुन संत तुकोबाराय, श्रीक्षेत्र नरसी येथुन संत नामदेव महाराज , श्रीक्षेत्र सासवड येथुन संत सोपान काका व श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथुन आदिशक्ती मुक्ताबाई हया सात मानाच्या पालख्या व पायी दिंडया निघत असतात. याशिवाय महाराष्ट्र व कर्नाटक भरातुन असंख्य छोटया मोठया उपदिंडया ही निघत असतात. साधारण पणे लक्षावधी भाविक महिनाभर पायी चालत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सगळं सहन करत हाल अपेष्टा भोगत पांडुरंग भेटीस जात असतात. हा एक जागतिक पातळीवर अभुतपुर्व असा लक्षणीय सोहळा आहे. यंदा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथुन संत निवृत्तीनाथ दादाची पालखी जुन महिन्याच्या अखेरीस निघणार आहे. यंदा भर पावसाळयात चंद्रभागातीरी भक्तीचा महापुर लोटणार आहे. दरवर्षी पायी वारी करणार्या भाविकानां मात्र पाऊस पाण्याचे ही फार काही नसुन “भेटीलागी जीव, लागलीसे आस” असे म्हणत “केला नेम चालवी माझा” असे विनवणी करत तयारीस लागले आहेत.
