
नांदगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या सन्मती बाल निकेतन संस्था पुणे या पवित्र आवारात कवयित्री आणि संचालिका ममताताई सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या वंशावळी च्या प्राचीन सरीतून या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले. या प्रकाशन समारंभ प्रसंगी
संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, लेखक संदीप राक्षे, पवना सहकारी बँकेचे संचालक दादू डोळस, नंदकुमार पवार, किरण पवार, अविनाश पवार, योगेश पवार, सौ नैनिता पवार, सौ मनीषा पवार आदी उपस्थित होते.
