
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२७० वा दिवस
ज्यांची स्वतःची जीवनी उजळून निघालेली आहेत, अशा या ज्योतिर्मयाच्या पुत्रांचा संग लाभणे फार दुर्लभ आहे. त्यांच्या संगतीतील काही क्षणांनीच एखाद्याचे अवघे जीवनच पार बदलून जाऊ शकते. आणि तुमचे अंतकरण खरोखरच असल्या एखाद्या महापुरुषाच्या संगलाभासाठी तळमळत असेल तर, तुमची अशा एखाद्या महापुरुषाशी नक्कीच गाठ पडेल. त्यांच्या चरणकमलाचा आश्रय लाभून तुम्ही धन्य व्हाल. हे भगवत् भक्त जिथे कुठे बसतात ते ठिकाण त्यांच्या निवासाचे तीर्थस्थान बनते. ते जे काही बोलतात ते शास्त्र होते. ते जे काही करतात ते सत्कर्म असते. हे त्यांचे महात्म्य, हा असा त्यांचा महिमा. हे असले महान भक्त आणि साक्षात परमेश्वर एकच आहेत. अलम दुनियेत ज्याला 'माझे' म्हणायला काहीही नसते, भगवान त्याचेच होतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २४ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. १४ मे २०२६
★ १६५७ हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे भोसले यांचा जन्मदिन (पुरंदर किल्ल्यावर)
★ १९८४ फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
