
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र कै. रोडूआण्णा पाटील यांच्या १४ व्या स्मृतीदिनी गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेंद्र दुकळे व मान्यवरांच्या हस्ते रोडूआण्णांच्या समाधीचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समवेत सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे, दगडू पटांग्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक, प्राचार्य पी. जी. माने पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानलेत.
