
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६८ वा दिवस* जग माझ्यासाठी आहे, मी कदापी जगासाठी नाही. चांगले आणि वाईट हे आमचे गुलाम आहेत, आम्ही कदापि त्यांचे गुलाम नाही. ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत पडून राहणे हा पशुचा स्वभाव आहे, प्रगतीला उन्नतीला तो अजिबात पारखा असतो. माणसाचा स्वभाव मात्र वाईट टाळून चांगले मिळविण्याचा प्रयत्न करणे. आणि ईश्वराचा स्वभाव असतो चांगले किंवा वाईट यापैकी कशाच्याच मागे न लागणे सदा सर्व अवस्थेत आनंदित,उत्साहीत राहणे. आपल्याला ईश्वर व्हावे लागेल. हृदय सागरासारखे विशाल करा. जगातील सर्व प्रकारच्या शुल्लकपणाच्या पलीकडे निघून जा; फार काय पण अशुभ आले तरीही आनंदाने धुंद होऊन जा. ही खून गाठ बांधून असा की जगातील काहीही तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. काहीही तुम्हाला विचलित करू शकणार नाही आणि मग जगाच्या सौंदर्याचा उपभोग घ्या. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर वैशाख/माधवमास २२ शके १९४८*
★ वैशाख वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. १२ मे २०२६
★ संत मुक्ताबाई पुण्यतिथी मुक्ताईनगर
★ १६६६ आग्रा येथे दरबारात छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबाची पहिली व अखेरची भेट झाली.
★ १९५२ भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या संसदीय अधिवेशनास प्रारंभ.
★ २०१२ नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांचा १४ वा स्मृतीदिन.
★ जागतिक परिचारिका दिन.
