
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६४ वा दिवस
आपल्या आत जीवात्मा आणि परमात्मा हे दोन्ही विद्यमान आहेत. ज्ञानीजन जाणून आहेत की जिवात्मा हा केवळ प्रतिबिंब आहे. आणि परमात्मा हाच खराखुरा सत्य वा सूर्य आहे. आपण जर आपले मन इंद्रियांशी संयुक्त केले नाही तर आपल्याला नाक कान डोळे वगैरे इंद्रियांद्वारे काहीच ज्ञान वा संवेदना प्राप्त होऊ शकणार नाहीत. या बाह्य इंद्रियांना मन हे साधनांसारखा वा उपकरणासारखा उपयोग करीत असते. इंद्रियांना बाहेर जाऊ देऊ नका, म्हणजे मग देह आणि बहिर्जगत या दोघांच्याही तावडीतून तुमची सहज सुटका होऊ शकेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १८ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ८ मे २०२६
★ १८२८ रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचा जन्मदिन
★ १९१६ भारतीय तत्वज्ञ स्वामी चिन्मयानंद यांचा जन्मदिन
★ जागतिक रेडक्रॉस दिन.
