
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६३ वा दिवस
आपल्याच वैयक्तिक मुक्तीकामनेने तुम्ही जर सर्वस्वाचा त्याग केला तर तो कसला त्याग ? जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुक्तीवर देखील पाणी सोडण्याची तुमची तयारी आहे काय? तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप आहात हे लक्षात घ्या. तुमच्या ठिकाणी जर ज्वलंत श्रद्धा असेल, सर्वविजय प्रेम असेल, सर्वशक्तिमान पवित्र असेल तर अल्पकाळातच तुम्हाला यश मिळेल याची खात्री बाळगा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १७ शके १९४८
★ वैशाख वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ७ मे २०२६
★ १८६१ नोबेल पारितोषिक विजेते कविसम्राट, “गीतांजलीकार” गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची जयंती.
★ १८७८ पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे भरविण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती रानडे होते.
★ १८८० विख्यात कायदेपंडित, महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडूरंग वामन काणे यांचा जन्मदिन.
★ २००२ जेष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
