
नाशिक जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर
सरकार एकीकडे चोविस तास सुरळीत विजेचा दावा करत असतानां ग्रामीण भागात ऐन प्रचंड उन्हाळयात वांरवार वीजपुरवठा खंडित होतो आहे.या बाबत कुठलीही पुर्वसुचना दिली जात नसुन मनमर्जीने वाट्टेल तसा पोरखेळ सुरु असुन यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.
इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली सह परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो आहे.पावसाळी पुर्व कामाच्या नावाखाली हा वीज पुरवठा मन मानेल त्या पद्धतीने सुरु व बंद केला जातो आहे.
ऐन उन्हाळयात विज वितरण च्या या खेळाने लोकाचां घाम निघत आहे.
बाहेर जावे तरी उय्णता व घरात बसावे तरी उष्णता. विज वितरण त्या कृपेमुळे घरातील महागडी थंड हवा देणारी उपकरणे ही शोभेची ठरत आहे.
व्यावसायिकाचें अतोनात नुकसान
विज वितरणच्या सावळया गोंधळामुळे थंड पेये विक्री करणार्या व्यावसायिकाचें अतोनात नुकसान होत आहे.
विज नसल्याने नाशवंत असणारी थंडगार खादय पेये वितळुन पाणी होत असल्याने फेकुन दयावे लागते.
तसेच विजेवर आधारीत सर्वच व्यावसायिकानां याचा फटका बसुन अतोनात नुकसान होत आहे.
