
नांदगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी नांदगाव मंडळाच्या वतीने विविध राज्यांमध्ये भाजपाने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर जल्लोष साजरा करण्यात आला. पश्चिम बंगाल, आसाम आणि पोंडेचरी या राज्यांमध्ये भाजपाच्या यशाबद्दल कार्यकर्त्यांनी उत्साह व्यक्त करत फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.यावेळी “जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा” अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमाचे आयोजन सतीश बाळासाहेब शिंदे यांनी केले.सरचिटणीस सचिन पांडे व ॲड. शेखर पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा विजय केवळ राजकीय नसून देशाच्या विचारसरणीचा विजय आहे.” तसेच सरचिटणीस श्री. बबन मोरे यांनी भाजपाने नेत्रदीपक यश संपादन केल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमास मा. किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सजन तात्या कवडे, डॉ. राजेंद्र आहेर, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश अहिरे,ओ बी सी मोर्चा ता. अध्यक्ष श्री दिनेश जेजुरकर राजेंद्र गांगुर्ड, ॲड. उमेश सरोदे, अन्नपूर्णाताई जोशी, अरुण पवार बळवंत चौधरी, डॉ. बी. के. आहेर, रवी कवडे, वैभव दादा देशमुख, चंद्रकांत कुलकर्णी, गोपि कासार, सुरेश कुमावत, संदीप पवार, माधव काजळे, भाऊसाहेब गायकवाड, मनोज शर्मा, शंकर वाघमोडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
