
–सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२६० वा दिवस* आपण सुख भोगासाठी एखाद्या विशिष्ट गोष्टीवर अवलंबून असता कामा नये. जे तसे अवलंबून असतात ते तामस प्रवृत्तीचे म्हणजे बद्ध जीव होत. त्यानंतर म्हणजे राजस प्रवृत्तीचे लोक त्यांचा अहंकार फार प्रबळ असतो. ते सदा मी, मी करीत असतात. ते कधीकधी चांगले काम करतात, प्रयत्न केल्यास ते कदाचित धार्मिक बनू शकतील. परंतु सात्विक प्रवृत्तीचे लोकच सगळ्यात श्रेष्ठ होत; ते अंतर्मुख असतात, ते सदा आत्मनिष्ठ असतात. सत्व रज आणि तम हे तीन गुण ज्ञानाचा प्रकाश, कर्मप्रवणता आणि जडता वा आळस हे तीन गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात असतात. एकेका वेळी त्यातील एकेकाचे प्राबल्य वाढते इतकेच काय ते म्हणता येईल.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर वैशाख/माधवमास १४ शके १९४८*
★ वैशाख वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. ४ मे २०२६
★१९८९ भारतातील ग्रामपंचायत व पंचायत समिती यामध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याची पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
★ १९९५ बाॅम्बे ऐवजी मुंबई शब्द वापरला जावा, असा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
★ कोळसा कामगार दिन
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
