
ओझर:दि.९ (वार्ताहर)येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अभिनव बाल विकास मंदिर ओझर मिग या शाळेतील MVPTS स्पर्धा परीक्षेत इ.3री मधील कु.शिवम शरद मोरे, काव्या ज्ञानेश्वर अमराळे, तेजस्वीनी विशाल नऱ्हे, प्राजंल प्रशांत चौधरी, स्वरा संदिप जोशी, वेदिका सुधीर गावंडे, कस्तुरी हर्षल गिते, ओम नारायण भोसले, कुंजल कैलास नाईक, वेदिका विजय गाडे, भक्ती राजकुमार वारे हे ११ विद्यार्थी नाशिक जिल्ह्यात गुणवत्ता यादीत आले. त्याबद्दल त्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, शालेय समिती व पालकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच अभिनव बाल विकास मंदिर ओझर मिग शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वनिता शिरसाठ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.दिनकर दराडे व श्रीम.पुनम थेटे यांचेही संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
