
.ओझर:दि.९ (वार्ताहर) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती मा डी बी मोगल यांनी येथील माधवराव बोरस्ते विद्यालयास सदिच्छा भेट देऊन इमारत बांधकाम, शालेय कामकाज व विद्यार्थी गुणवत्ते संदर्भात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी सविस्तर संवाद साधून शालेय अडीअडचणी संदर्भात मार्गदर्शन केले. यानिमित्त उपसभापती डी बी मोगल यांचा मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.

