
सायखेडा ( प्रतिनिधी)–महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचलनालय चे शिवशस्त्र शौर्यगाथा मराठा व समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय आज जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सायखेडा येथे आले

असता हे संग्रहालय पाहण्याचा आनंद विद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील पालक, ग्रामस्थ ,इतिहास प्रेमींनी घेतला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन शस्त्र या फिरत्यासंग्रहालयामध्ये ठेवण्यात आले असून तसेच या शस्त्रांचा कशा पद्धतीने युद्धसाठी वापर होत असे त्यांची नावे, चित्र, माहितीयाचा स्लाईड शो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला .

या उपक्रमाचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाजे रामदास यांनी कौतुक केले असून सदर फिरते संग्रहालयामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच इतिहासाची आवड निर्माण होईल असे त्यांनी सांगितले व शासनाचे आभारही मानले. तसेच पुस्तकातील शस्त्रांची चित्रे बघितली होती. पण आज प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वापरली जाणारी शस्त्र प्रत्यक्षात बघायला मिळाली भाले, तलवारी, दानपट्टा वाघनखे ,धनुष्यबाण ढाल, बाण इ. शस्त्र पाहून खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. संग्रहालय जनता इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सायखेडा, जिल्हा परिषद शाळा सायखेडा, अभिनव बाल विकास मंदिर सायखेडा, स्वामी षटकोपाचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा, मॉडर्न इंग्लिश स्कूल चांदोरी व परिसरातील 1850 पेक्षा अधिक विद्यार्थी, पालक, यांनी पाहण्याचा आनंद घेतला .

संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी बघण्यासाठी नागेश्वर करवंदे व त्यांचे सहकारी यांचा सहकार्य लाभलं. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका अहिरे मॅडम, पर्यवेक्षक पगार सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले.
