
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३२ वा दिवस
वेदांमध्ये सांगितलेली सत्य तत्वे शाश्वत, चिरकाल आहेत. ती त्रिकालाबाधित आहेत पण स्मृती मात्र कालसापेक्ष आहेत. जसजसा कालौघ पुढे जाईल तसतशा नवनव्या स्मृती येत राहतील. या देशाच्या भूतकाळात अनेक श्रेष्ठत्तम गोष्टी घडल्या आहेत. भविष्यकाळात याहुनी श्रेष्ठतम गोष्टी घडावयास मोठा वाव आहे. आपण सर्वांनी मिळून पुढे गेले पाहिजे. प्रगती केली पाहिजे, पराक्रम केला पाहिजे. श्रेष्ठतम कृती हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १६ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ६ एप्रिल २०२६
★ १९३० प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
★ १९८० भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले.
★ १९८३ भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचा स्मृतिदिन.
