
जातेगाव (प्रतिनिधी):जनता विद्यालय जातेगाव येथे डॉ. वसंतराव पवार यांची जयंती साजरी
येथील जनता विद्यालय, जातेगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री. बच्छाव आर. एन. यांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ. पवारांना विनम्र अभिवादन केले.
श्री. मराठे एस. एम. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. वसंतराव पवार यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकला. संस्थेच्या प्रगतीमध्ये आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात साहेबांचे कार्य कसे दिशादर्शक ठरले, याचे महत्त्व त्यांनी विषद केले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. पवारांच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याचे स्मरण करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
