
उरुळी कांचन ( प्रतिनिधी )मूक नायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेयर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित ३ एप्रिल १९२७ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेले बहिष्कृत भारत पाक्षिक ९९ वर्षेपूर्ती शताब्दी निमित्त संघ नायक न्यूजचा १० वर्धापन दिनानिमित्त विशेष ‘संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६’ नुकताच संपन्न झाला. उरुळी कांचन मधील साने संगीत लोक कलामंचचे संस्थापक – शिवराज ज्ञानोबा साने यांना संघ नायक पुरस्कार –२०२६ आदर्श कला शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार सदाशिव कांबळे सह पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार एम.जी.शेलार, विर गोविंद गोपाळ महार यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब चौधरी, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, आबासाहेब चव्हाण, संदिप बडेकर, बाबासाहेब बेडेकर, आदी पुरस्कार प्राप्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक पत्रकार सदाशिव कांबळे यांनी संघ नायक चा मुख्य उद्देश ध्येय याबाबत सविस्तर माहिती दिली. आभार पत्रकार अनिल गायकवाड यांनी मानले. आजपर्यंत करत असलेल्या कार्याची दखल घेऊन संघ नायक पुरस्कार २०२६ आदर्श कला संगीत शिक्षक म्हणून दिला आयोजकांचे विशेष आभार माझ्या कडे शब्द नाहीत. माझ्या यशात आई वडील गुरुजण तसेच असंख्य मित्र मंडळी यांचे योगदान आहे.
