
ओझर:( वार्ताहर) येथील ‘मविप्र’ संचलित बोरस्ते विद्यालयात संस्थेचे माजी सरचिटणीस खासदार कै डॉ वसंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी डॉ पवारांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत यांनी डॉ पवारांच्या शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर माहिती दिली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदानुसार त्यांनी तळागाळातील समाजासाठी ज्ञानाची द्वारे खुली केली असे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात सोपान वाटपाडे यांनी, ‘असेन मी नसेल मी माझ्या कार्यातून दिसेन मी’ या डॉ पवारांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट करून देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास व्यासपीठावर संगीता शेटे स्वाती देवरे संगीता भदाणे संगीता सोनवणे मेघा शेजवळ राजेंद्र बागले आदी सेवक उपस्थित होते. फलकलेखन कलाशिक्षक मोहन क्षीरसागर यांनी केले.
