
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२३० वा दिवस
शुद्धता पवित्रता आणि दयाशीलता या गोष्टी कोणत्याही एका संप्रदायाच्या वा धर्माच्या मालकीच्या नाहीत प्रत्येक धर्माने श्रेष्ठ आणि थोर स्त्री पुरुषांना जन्माला घातले आहे. इतके सारे पुरावे सादर केल्यानंतरही कुणाला असे वाटत असेल की बाकी सारे धर्म बुडावेत आणि केवळ माझाच धर्म अस्तित्वात राहावा तर मला त्याची कीव करावीशी वाटते. मी त्याला हे या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की लवकरच सर्व धर्मांच्या झेंड्यावर 'युद्ध नको मदत हवी', 'विनाश नको निर्मिती हवी', मतभेद आणि कलह नको तर एकसंघता आणि शांतता हवी या गोष्टी लिहिलेल्या आढळतील.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र १४ शके १९४८
★ चैत्र वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ४ एप्रिल २०२६
★ १८२३ सुप्रसिध्द जर्मन विद्युत अभियंता सर कार्ल विल्यम सिमेन्स (अभियांत्रिकी क्षेत्रातील नावाजलेली बलाढ्य “सिमेन्स” ही कंपनी त्यांच्याच नावाने स्थापन झाली आहे) त्यांचा स्मृतीदिन
★ १९६८ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे नेते मार्टीन ल्यूथर किंग ज्युनियर यांची हत्या. स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
