
सिन्नर ( प्रतिनिधी)३ एप्रिल २०२६ स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या स्मृतिदिनानिमित्त महामिञ परिवार , व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरूवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी धैर्य राखून आपलं सैन्य उभं केलं आणि मुघल राजवटी विरुद्ध न घाबरता उभे राहिले. कुठल्याही संकटाचा सामना हा अत्यंत धीराने आणि न घाबरता केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला छञपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये क्रांतिची प्रेरणा जाग्रुत करून सह्याद्रिच्या डोंगर द-यात राहणा-या अठरापगड जाती-जमाती मावळ्यांना मुस्लिम बांधवांना एकञ करून स्वराज्याची निर्मीती

केली.शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरीत झालेला प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी आपले प्राण द्यायला तयार होता .जुलूम,अन्याय अत्याचार करणा-यांना वठनीवर आणण्याचं काम शिवरायांनी केलं.शिवरायांच्या स्वराज्यात जाती-धर्म भेदभावाला अन्याय अत्याचाराला थारा नव्हता.म्हणुनच जगाने शिवरायांची प्रेरणा घेतली छत्रपती शिवाजी महाराज हे एक कार्यक्षम आणि ज्ञानी सम्राट म्हणून ओळखले जात होते.महाराजांना भारतीय इतिहास आणि भारतातील राजकारणाची उत्तम जाण होती. अनेक वेळा मुत्सद्देगिरीचा अवलंब केले
३ एप्रिल, १६८० हा महाराष्ट्रासाठी तसेच संपूर्ण रयतेसाठी अतिशय काळा दिवस होता. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरतीअखेरचा श्वास घेतला
अशा महान न्यायी राजा बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण प्रजाहितदक्ष लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन!
यावेळी आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे मा.नगरसेवक रुपेशभाऊ मुठे भुषन मोरे आपले मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी , महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,भुषन मोरे, किरण माळी,बंटी सातभाई, राजु जाधव आदि उपस्थित होते.
